Join us

‘लोकमत आपल्या दारी’ आज सहार गावात

By admin | Updated: June 15, 2016 02:40 IST

अंधेरी (पूर्व) सहार गावातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘लोकमत आपल्या दारी’ हे व्यासपीठ सहारवासीयांसाठी उपलब्ध करून दिले आहे. उद्या (दि. १५) रोजी सायंकाळी

मुंबई : अंधेरी (पूर्व) सहार गावातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘लोकमत आपल्या दारी’ हे व्यासपीठ सहारवासीयांसाठी उपलब्ध करून दिले आहे. उद्या (दि. १५) रोजी सायंकाळी ७.०० वाजता सहार गावातील अवर लेडी आॅफ हेल्थ चर्चच्या परिसरात सहार सिटीझन्स फोरम, सहारवासीय, वॉच डॉग फाउंडेशन, सेव्ह अवर लॅण्ड, द बॉम्बे इस्ट इंडियन असोसिएशन, गार्डियन्स युनायटेड, सिव्हिक अ‍ॅण्ड पॉलिटिकल सेल-चिवीम चर्च या विविध संस्था आणि त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ‘लोकमत’च्या माध्यमातून येथील समस्या मार्गी लागणार असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये आणि मुंबईतील गावठाणे आणि कोळीवाड्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याचे वॉच डॉग फाउंडेशनचे संचालक ग्रॉडफे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा यांनी म्हटले आहे. सहार सिटीझन्स फोरमचे डोनाल्ड डिलिमा, सेव्ह अवर लॅण्डच्या डॉल्फी डिसोझा, गर्ग पेरेरा, स्टॅन्ली फर्नांडिस, वॉच डॉग फाउंडेशनचे ग्रॉडफे पिमेंटा व निकोलस अल्मेडा आणि द बॉम्बे इस्ट इंडियन असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. व्हिवियन डिसोझा यांनी सहार गावातील समस्या सुटण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमासाठी हिरिरीने पुढाकार घेतला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.