Join us  

प्रकाश मेहतांवर लोकायुक्तांचे ताशेरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 6:03 AM

मुंबई : एमपी मिल कम्पाउंड प्रकरणात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या कारभारावर लोकायुक्तांनी ताशेरे ओढले आहेत.

मुंबई : एमपी मिल कम्पाउंड प्रकरणात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या कारभारावर लोकायुक्तांनी ताशेरे ओढले आहेत. अधिकारांचा गैरवापर करून विकासकाच्या फायद्यासाठी निर्णय घेण्यात आले का, याचा तपास व्हायला हवा, असे मत नोंदवितानाच या प्रकरणात मेहता यांनी दिलेली नियमबाह्य परवानगी नाकारता आली असती, असे स्पष्ट निरीक्षणही लोकायुक्तांनी नोंदवले आहे.एमपी मिल कम्पाउंडसह मुंबईतील एमपी मिल कम्पाउंड प्रकरणात विकासकाच्या फायद्यासाठी निर्णय घेण्यात आला असून, त्यात पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता. या प्रकरणाची लोकायुक्तांसमोर चौकशी सुरू आहे. लोकायुक्तांच्या प्रथमदर्शनी अहवालावर प्रकाश मेहता यांना ६ डिसेंबरपर्यंत आपले म्हणणे मांडायचे आहे. गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी कम्पाउंडच्या प्रस्तावाला विरोध केला. पण मेहता यांनी ही फाईल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला. विशेष, म्हणजे याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना कसलीच कल्पना देण्यात आली नव्हती.

टॅग्स :प्रकाश मेहतामुंबई