Lok Sabha Election 2019 Mumbai North candidate Gopal Shetty | Lok Sabha Election 2019 : गोपाळ शेट्टी यांनी कुटुंबीयांसह बजावला मतदानाचा हक्क
Lok Sabha Election 2019 : गोपाळ शेट्टी यांनी कुटुंबीयांसह बजावला मतदानाचा हक्क

ठळक मुद्देउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी जे. बी. खोत शाळा, साईबाबा नगर, बोरिवली पश्चिम येथे सहकुटुंब उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला.नागरिकांनी दाखवलेल्या उदंड प्रतिसादाबद्द्ल गोपाळ शेट्टी यांनी आनंद व्यक्त केला आहे. मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली आहे.

मुंबई - उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी सोमवारी (29 एप्रिल) सकाळी साडे सात वाजता जे. बी. खोत शाळा, साईबाबा नगर, बोरिवली पश्चिम येथे सहकुटुंब उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांच्या सोबत त्यांची पत्नी, आई आणि अन्य कुटुंबीय उपस्थित होते. नागरिकांनी दाखवलेल्या उदंड प्रतिसादाबद्द्ल गोपाळ शेट्टी यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

'मी दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही सकाळीच सहकुटुंब मतदान केंद्रावर आलो. सकाळपासून केंद्रावर लोकांची रांग बघून मन फार प्रसन्न झाले आहे. 1992 साली लोकांना मतदान करा हे सांगण्यासाठी घरातून बोलावून आणायला लागायचे पण आता हे चित्र बदलले आहे. हा सुखद बदल पाहून वाटतं कि जेवढं काम आपण करतो त्यापेक्षाही जास्त प्रेम लोक आपल्यावर करतात आणि जेवढे प्रेम लोक करतात त्या पेक्षाही जास्त काम आगामी काळात मी करतच राहीन' असं गोपाळ शेट्टी यांनी म्हटलं आहे. 


मुंबईत आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत मुंबईतून 116 उमेदवार नशीब आजमावत आहेत. बॉलिवूड सेलिब्रेटी ही आज आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. अभिनेत्री रेखा आणि प्रियंका चोप्राने सकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. उर्मिला काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. भाजपा उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्यावर विरोधात त्या निवडणुक लढवत आहेत. 


लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली आहे. मुंबईतल्या ईशान्य मतदारसंघासह सहा लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान पार पडत आहे. निवडणुकीत मुंबईतून 116 उमेदवार नशीब आजमावत आहेत. मुंबईतल्या सहाही जागांवर महायुती आणि आघाडीत थेट लढत असली, तरी वंचित बहुजन आघाडी आणि मनसेमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत मुंबईने एकतर्फी कौल दिला होता. 2014साली सर्व जागा युतीकडे तर त्या आधी 2009 साली सहाही जागा आघाडीकडे होत्या. एकाच पारड्यात दान टाकण्याची प्रथा यंदा कायम राहणार की बदलणार, याबाबत उत्सुकता आहे.

 


Web Title: Lok Sabha Election 2019 Mumbai North candidate Gopal Shetty
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.