Lockdown: विवाह, अंत्यविधीसाठी ५० पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास अजूनही बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 02:37 AM2020-07-02T02:37:58+5:302020-07-02T02:38:18+5:30

अनलॉकच्या चौथ्या टप्प्याअंतर्गत मुंबई पालिकेची नियमावली जारी

Lockdown: More than 50 people still banned from attending weddings and funerals | Lockdown: विवाह, अंत्यविधीसाठी ५० पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास अजूनही बंदी

Lockdown: विवाह, अंत्यविधीसाठी ५० पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास अजूनही बंदी

Next

मुंबई : अनलॉकच्या चौथ्या टप्प्याअंतर्गत मुंबई पालिकेने नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार खासगी कार्यालये १० टक्केच उपस्थिती आणि याआधी जाहीर केलेल्या नियमांनुसार सुरू राहतील. सार्वजनिक कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी असून विवाहासाठी किंवा अंत्यविधीसाठी ५० पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्याची परवानगी नाही.

  • गॅरेजमध्ये जाण्यासाठीही अपॉइंटमेंट गरजेची
  • सार्वजनिक, कामाचे ठिकाण व प्रवासात मास्क बंधनकारक.
  • खासगी कार्यालये १० टक्केच उपस्थिती आणि याआधी जाहीर केलेल्या नियमांनुसार चालणार आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी किमान सहा फुटांचे अंतर राखणे गरजेचे आहे. मद्यपान, धुम्रपान, थुंकल्यास कठोर कारवाई होईल.
  • खासगी कंपन्यांनी शक्यतो कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ सुविधा द्यावी. कार्यालयात एन्ट्री-एक्झिटवर सॅनिटायजर, स्क्रिनिंग सुविधा असावी.
  • टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकीमध्ये ‘चालक आणि दोन प्रवाशांनाच परवानगी असेल. तर दुचाकीवर डबलसीट घेता येणार नाही.
  • गॅरेजमध्ये गाड्या दुरुस्त करण्याची सुविधाही अपॉइंटमेंटनेच द्यावी.

Web Title: Lockdown: More than 50 people still banned from attending weddings and funerals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.