Join us  

लोकलप्रमाणे मेट्रोही एकमेकांना जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 5:29 AM

मुंबई आणि मुंबईलगतच्या भागांमध्ये लवकरच मेट्रोचे मोठे जाळे उभारले जाणार आहे.

मुंबई : मुंबई आणि मुंबईलगतच्या भागांमध्ये लवकरच मेट्रोचे मोठे जाळे उभारले जाणार आहे. मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर लोकलप्रमाणेच मुंबईतील विविध मेट्रो मार्गिका आणि मोनोरेल एकमेकांस जोडल्या जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी मार्ग बदलून प्रवास करणे सोयीचे होणार आहे.कुलाबा-वांद्रे-सीप्झ ही मेट्रो-३ भुयारी मार्गिका मरोळ नाका येथे घाटकोपर-वर्सोवा या मेट्रो-१ मार्गाला जोडणार असून महालक्ष्मी येथे मोनोरेलला जोडली जाणार आहे. यासह मेट्रो-७ आणि मेट्रो-८ हे दोन्ही मेट्रो मार्ग एअरपोर्ट टर्मिनल-२ येथे होणार आहेत. लोकलचे तिन्ही मार्ग एकमेकांस जोडलेले असल्याने लोकलचा प्रवास प्रवाशांना सुकर वाटतो. याप्रमाणेच मेट्रोच्या प्रस्तावित मार्गिका एकमेकांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) मेट्रो रेलचे मार्ग विविध ठिकाणी जोडण्याचे ठरवले आहे. डी.एन. नगर ते मंडाले हा मेट्रो-२ बी मार्ग मेट्रोच्या वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) स्थानकामध्ये जोडला जाणार आहे. त्याचप्रमाणे या मेट्रो मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरही जाता येणार आहे.