Join us  

लोकलमध्ये सिगारेट ओढत रंगला पत्त्यांचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 6:58 AM

लोकलमध्ये ग्रुप करून सिगारेट ओढत पत्ते खेळत असल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. याबाबत प्रवाशांनी सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीला जाब विचारला असता, ‘आम्ही रेल्वे कर्मचारी आहोत, काहीही करू’ असे उर्मट उत्तर प्रवाशांना मिळाले.

- महेश चेमटेमुंबई  - लोकलमध्ये ग्रुप करून सिगारेट ओढत पत्ते खेळत असल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. याबाबत प्रवाशांनी सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीला जाब विचारला असता, ‘आम्ही रेल्वे कर्मचारी आहोत, काहीही करू’ असे उर्मट उत्तर प्रवाशांना मिळाले. यामुळे रेल्वे कर्मचाºयांकडूनच लोकलच्या सुरक्षा व नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून येते.गुरुवार, ७ जून रोजी दुपारी ४ वाजून ४ मिनिटांनी भायखळा स्थानकात कल्याण लोकल आली. या वेळी लोकलमध्ये काही प्रवासी ग्रुपने पत्ते खेळत होते. यापैकी एक व्यक्ती सिगारेट ओढत होती. याचबरोबर पत्ते खेळणाºया ग्रुपकडून लोकलमध्ये जागा अडवून ठेवण्यात आली होती. याबाबत व्हिडीओ सुहास कदम या प्रवाशाने काढला आहे. सुहास आणि अन्य प्रवाशांनी या गु्रपला ‘लोकलमध्ये सिगारेट ओढू नका’ असे सांगितल्यानंतर संबंधित ग्रुपकडून ‘आम्ही रेल्वे कर्मचारी आहोत, काहीही करू, आम्हाला नियम नका सांगू’ असे उर्मट उत्तर देण्यात आले.मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.के. जैन यांनीदेखील त्यांना फोन आणि मेसेज करूनही उत्तर दिले नाही. या प्रकरणी मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता त्यांनीही प्रतिसाद दिला नाही.कारवाई व्हावीलोकलमध्ये सिगारेट ओढण्यास बंदी आहे. संबंधित व्यक्ती रेल्वे कर्मचारी असल्यास अशा कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई होणे आवश्यक आहे. कारवाईमुळे अन्य प्रवाशांनादेखील धडा मिळेल.- समीर झव्हेरी,रेल्वे सामाजिक कार्यकर्ताअपुºया सुरक्षा व्यवस्थेमुळे आगीच्या घटना - रेल्वे बोर्डरेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना ३१ मे रोजी पत्र लिहून रेल्वेमध्ये लागत असलेल्या आगीबाबत विचारणा केली. रेल्वे बोगीत ५ महिन्यांत १५ आगीच्या घटना घडल्या आहेत. तपासणीमध्ये दुर्लक्ष आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे या घटना घडत असल्याचे रेल्वे बोर्डाने पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. त्यातच रेल्वे कर्मचारीच लोकलमध्ये सिगारेट ओढत असल्याने प्रवाशांमध्येनाराजी आहे.

टॅग्स :मुंबई लोकलबातम्या