Local train to buffer at CSMT station | सीएसएमटी स्थानकात बफरला लोकल धडकली
सीएसएमटी स्थानकात बफरला लोकल धडकली

मुंबई : मध्य रेल्वेमार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात हार्बर मार्गावर लोकल बफरला धडकली. ही दुर्घटना शुक्रवारी फलाट क्रमांक १ वर सकाळी ११ च्या सुमारास घडली. यात मोठी हानी झाली नसली तरी फलाट क्रमांक १ वरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

बेलापूरहून सीएसएमटीला आलेली लोकल बफरला धडकताच मोटरमनने तातडीने ब्रेक दाबला. त्यामुळे लोकलला हादरा बसला. उभे असलेले काही प्रवासी एकमेकांवर कोसळले. काहींना मुका मार लागला. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी सांगितले की, फलाटावर आलेली लोकल सुरक्षित उभी राहावी यासाठीच फलाटाच्या सुरुवातीला बफर लावले जातात. बेलापूरहून आलेली ही लोकल बफरला धडकली तेव्हा अतिशय धिम्या गतीत होती. लोकल सुस्थितीत असून ती फेरीसाठी रवानादेखील झाली आहे.


Web Title: Local train to buffer at CSMT station
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.