Join us  

तिसऱ्या टप्प्यातील रिक्त जागांची यादी उद्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 6:33 AM

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या तिसºया टप्प्यासाठी १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता रिक्त जागांची यादी प्रवेश समितीकडून जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई :अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या तिसºया टप्प्यासाठी १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता रिक्त जागांची यादी प्रवेश समितीकडून जाहीर करण्यात येणार आहे.अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या दुसºया प्राधान्य फेरीचा दुसरा टप्पा शनिवारी पार पडला. यासाठी ६६,४६३ जागा उपलब्ध होत्या. कोट्याच्या १६,६०२ जागांचा समावेशही करण्यात आला होता. दुसºया फेरीच्या पहिल्या टप्प्यात १,०४७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याने त्यांना प्रवेश दिलासा मिळाला. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थी ८ ते १० सप्टेंबरपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करू शकतील. १० सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजता तिसºया टप्प्यातील रिक्त जागांची यादी जाहीर होईल.प्राधान्य फेरीच्या दुसºया टप्प्यात ३५ टक्क्यांहून गुण असणाºया विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी होती. जनरल, कोट्याच्या मिळून ८३,०६५ रिक्त जागा या टप्प्यासाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. ‘प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य’ यानुसार दुसºया फेरीत एटीकेटी आणि पुनर्परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन प्रवेश फेरीचा निर्णय केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने घेतला. दुसºया टप्प्यात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना संगणकीकृत पावतीच्या आधारेच महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येईल.>अंतिम फेरी असण्याची शक्यतादुसºया प्राधान्य फेरीच्या पहिल्या, दुसºया टप्प्याप्रमाणेच तिसºया टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया पार पडेल. एटीकेटी आणि पुनर्परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीची ही पहिलीच फेरी असल्याने ती विशेष महत्त्वाची आहे. ११ सप्टेंबरपर्यंत ही फेरी सुरू राहील. आतापर्यंत चार मूळ, पाचवी विशेष व सहावी प्रथम प्राधान्याची पहिली फेरी पूर्ण झाली असून आता प्रथम प्राधान्याची दुसरी फेरी सुरू आहे. ही आतापर्यंतच्या प्रवेशाच्या एकूण फेरीतील सातवी फेरी आहे. त्यामुळे कदाचित ही फेरी अंतिम फेरी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.