Join us  

उपनगरीय स्थानकांवरही आता एलईडी दिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 6:10 AM

मध्य रेल्वेने खर्च कपातीच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई : मध्य रेल्वेने खर्च कपातीच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. यानुसार मध्य रेल्वेवरील मुंबई उपनगरीय सर्व रेल्वे स्थानकांवर एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. कामाला सुरुवात झाली असून जुलैअखेर मध्य रेल्वेच्या ३७ स्थानकांवर एलईडी दिवे कार्यान्वित करण्यात आले आहेत. या दिव्यांमुळे वार्षिक ७७ लाखांची बचत होणार आहे. तर मध्य रेल्वे एलईडी दिवे आणि सौरऊर्जा प्रकल्पांमुळे मिळून वार्षिक १ कोटी ४ लाख रुपयांची बचत करणार आहे.रेल्वे मंत्रालयाने सर्व विभागांना शक्य तेथे पर्यावरणपूरक आणि विद्युतभार कमी करणारे एलईडी दिवे वापरण्याच्या सूचना केल्या आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय सर्व रेल्वे स्थानकांवर एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २०१८ ही डेडलाइन निश्चित केली आहे. मुंबई उपनगरीय मार्गावरील ३७ रेल्वे स्थानकांवर जुलैअखेर एलईडी दिवे लागले आहेत. उर्वरित ३९ रेल्वे स्थानकांवर लवकरच एलईडी दिवे कार्यान्वित होतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.>सौरऊर्जेचा वापरपारंपरिक ऊर्जास्रोतांपेक्षा अपारंपरिक ऊर्जास्रोतांचावापर करण्यातदेखील मध्य रेल्वे आघाडीवर आहे. सौरऊर्जेच्या वापरासाठी मध्य रेल्वेने सहा ठिकाणी सौरऊर्जा पॅनल कार्यान्वित केले आहे.मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसशेजारील अ‍ॅनेक्स इमारतीच्या छतासह, लोणावळा रेल्वे स्थानक, नेरळ, भायखळा, आसनगाव, कामन रोड या स्थानकांवर सौरऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. मध्य रेल्वे सौरऊर्जेच्या माध्यमाने १५० केडब्ल्यूपी ऊर्जेची निर्मिती करत आहे. सौरऊर्जा प्रकल्पांमुळे मध्य रेल्वे वार्षिक २७ लाखांपर्यंत बचत करत आहे.