Lata Mangeshkar: सर्वांना कळकळीची विनंती, लता दिदींच्या ट्विटरवरुन अधिकृत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 06:32 PM2022-01-22T18:32:37+5:302022-01-22T18:43:57+5:30

लतादीदींच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर मंगेशकर कुटुंबीयांतर्फे शुक्रवारी सायंकाळी एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले होते. ‘कृपया खोट्या बातम्या पसरवू नका.

Lata Mangeshkar: A heartfelt request to all, official information from Lata Mangeshkar Twitter | Lata Mangeshkar: सर्वांना कळकळीची विनंती, लता दिदींच्या ट्विटरवरुन अधिकृत माहिती

Lata Mangeshkar: सर्वांना कळकळीची विनंती, लता दिदींच्या ट्विटरवरुन अधिकृत माहिती

googlenewsNext

मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त शुक्रवारी सोशल मीडिया आणि काही टेलिव्हिजन माध्यमांतून प्रसारित झाले. मात्र, लतादीदींची प्रकृती स्थिर असून, अफवा पसरवू नका, असे आवाहन मंगेशकर कुटुंबीयांतर्फे करण्यात आले आहे. त्यानंतर, आज पुन्हा लता दिदींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देण्यात आली आहे. तसेच, सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांना कळकळीची विनंतीही करण्यात आली आहे. 

लतादीदींच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर मंगेशकर कुटुंबीयांतर्फे शुक्रवारी सायंकाळी एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले होते. ‘कृपया खोट्या बातम्या पसरवू नका. लतादीदी आयसीयूमध्ये आहेत, त्यांच्यावर डॉ. प्रतित समदानी आणि टीमकडून उपचार सुरू आहेत. त्या लवकरात लवकर बऱ्या होऊन घरी परताव्यात, यासाठी प्रार्थना करूया’, असे आवाहन निवेदनातून करण्यात आले आहे. त्यानंतर, आज सायंकाळी 6.15 वाजता लता मंगेशकर या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती देण्यात आली आहे. 


कृपया, त्रासदायक अफवा थांबवाव्यात ही कळकळीची विनंती. मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉ प्रतित समदानी यांच्याकडून लतादीदींच्या प्रकृतीविषयी महत्वपूर्ण अपडेट देण्यात येत आहे. दिदींच्या प्रकृतीत सकारात्मक सुधार दिसून येत असून, सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दिदींच्या लवकर बरे होण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी आपण सर्वजण प्रार्थना करतो आहोत, असे ट्विट लता मंगेशकर यांच्या अकाऊंटवरुन करण्यात आलंय. 
 

Web Title: Lata Mangeshkar: A heartfelt request to all, official information from Lata Mangeshkar Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.