जुहू बीचवरील खाद्यपेये विक्रेत्यांकडून भुईभाडे आकारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 05:27 AM2020-07-09T05:27:04+5:302020-07-09T05:27:29+5:30

अंधेरी येथील जुहू बीचवरील जमीन अतिक्रमणन नियमानुकूल करण्याकरीता मे. जुहू बिच खाद्यपेय विक्रेते को.आॅप. सोसायटी लि. यांना भाडेपट्टयाने देण्यात आली आहे.

Land will be charged from food and beverage vendors on Juhu Beach | जुहू बीचवरील खाद्यपेये विक्रेत्यांकडून भुईभाडे आकारणार

जुहू बीचवरील खाद्यपेये विक्रेत्यांकडून भुईभाडे आकारणार

googlenewsNext

मुंबई: जुहू बीच येथील खाद्यपेय विक्रेते को.आॅप. सोसायटी लि. यांना सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाच्या अनुषंगाने भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाच्या दरानुसार भुईभाडे आकारण्याचा निर्णय बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाने घेतला.
अंधेरी येथील जुहू बीचवरील जमीन अतिक्रमणन नियमानुकूल करण्याकरीता मे. जुहू बिच खाद्यपेय विक्रेते को.आॅप. सोसायटी लि. यांना भाडेपट्टयाने देण्यात आली आहे. यातील ७९४ चौ.मी. जमीन भारतीय विमान पत्तन प्राधिकरण यांची तर ४८९ चौ.मी. जमीन राज्य शासनाची आहे. या जमिनीवर प्रदान केलेल्या एकूण ८० स्टॉल आहेत. त्यापैकी भारतीय विमान पत्तन प्राधिकरण यांच्या जमिनीवर ४२ स्टॉल असून शासनाच्या जमिनीवर ३८ स्टॉल आहेत.
अतिरिक्त दूधाचे भुकटीत
रूपांतर करण्यास मुदतवाढ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुधाच्या मागणीत मोठया प्रमाणात घट झाल्यामुळे राज्यात अतिरिक्त दूधाचे रुपांतरण दूध भुकटीत करण्याची योजना राबविण्यात आली होती. तिला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

Web Title: Land will be charged from food and beverage vendors on Juhu Beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई