Join us

बनावट दस्तावेजाद्वारे विकली मृत व्यक्तीची जमीन

By admin | Updated: March 13, 2015 22:43 IST

तालुक्यातील जमिनींची बोगस खरेदी-विक्री करून शेतकऱ्यांचे फसवणुकीचे प्रकार नियमितपणे घडत असून त्या गैरव्यवहारापैकी हळूहळू एक एक प्रकरण उघडकीस येत आहे.

महाड : तालुक्यातील जमिनींची बोगस खरेदी-विक्री करून शेतकऱ्यांचे फसवणुकीचे प्रकार नियमितपणे घडत असून त्या गैरव्यवहारापैकी हळूहळू एक एक प्रकरण उघडकीस येत आहे.महाड तालुक्यातील वाळण केतीचा कांड येथील एका मृत शेतकऱ्याच्या मालकीची जमीन खोटे दस्तावेज तयार करून परस्पर विक्री करणाऱ्या सतरा जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात, न्यायालयाच्या आदेशानुसार काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरण येथील खंडेश्वर पाटील यांची या जमिनीच्या व्यवहारात १० लाख रुपयांची फसवणूक झाली असून त्यांनी या फसवणुकीविरोधात न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महेंद्र भगत, सुभाष पाटील, लक्ष्मी शेडगे, निर्मला पाटील, बबन पाटील, रमेश पाटील, विजय पाटील, राजेश पाटील, शैला पाटील, प्रवीण पाटील आदी सतरा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खंडेश्वर पाटील यांना विक्री केलेली जमीन ही केतकीचा कांड वाळण येथील दगड तांबेचा मृत शेतकऱ्याच्या मालकीची होती. मात्र त्यांच्या नावे बनावट दस्तावेज तयार करून या बनावट कागदपत्राच्या आधारे जमिनीची परस्पर विक्री करण्यात आलेली होती. ही बाब तांबे कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर या जमिनीच्या खरेदी-विक्रीत गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. (वार्ताहर)