Join us  

प्रौढांत लसीकरणाच्या माहितीचा अभाव, अभ्यासातून लसीकरणाविषयीचे अज्ञान उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 1:42 AM

लसीकरण ही सार्वजिनिक आरोग्यक्षेत्राद्वारे केल्या जाणा-या उपाययोजनांपैकी सर्वात परिणामकारक आणि किफायतशीर उपाययोजना असल्याचा दाखला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे.

मुंबई : लसीकरण ही सार्वजिनिक आरोग्यक्षेत्राद्वारे केल्या जाणा-या उपाययोजनांपैकी सर्वात परिणामकारक आणि किफायतशीर उपाययोजना असल्याचा दाखला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. असे असूनही ६८ टक्के प्रौढ व्यक्तींकडे त्यांच्यासाठी सुचवलेल्या लसींविषयी अद्ययावत माहिती नसल्याचे एका अभ्यास अहवालातून उघड झाले आहे.‘व्हॅक्सिनेशन फॉर लाइफ’ मोहिमेंतर्गत ब्राझिल, भारत, अमेरिका, जर्मनी आणि इटली या देशांमधील ६,००२ हून अधिक प्रौढांचे सर्वेक्षण करण्यात आले. या अहवालानुसार, लसीकरण हे फक्त मुलांसाठी किंवा बाळांसाठी आवश्यक असते असा १५ टक्के प्रौढांचा समज असल्याचे आढळून आले. यातील २१ टक्के लोकांना असे वाटत होते की केवळ प्रवासाला जाण्यापूर्वी लस टोचून घेण्याची गरज भासते.प्रौढांसाठीच्या लसीकरणाच्या महत्त्वाविषयी सरकारने पुरविलेली माहिती आपल्याला मिळालेली नाही असे ६० टक्के प्रौढांनी सांगितले. तसेच, आपल्याकडून लसीकरणापेक्षा इतर आरोग्यसेवांना अधिक प्राधान्य दिले जाईल असे ५३ टक्के प्रौढांनी मान्य केले. या अहवालात भारतातील सहा शहरांतील त्यात दिल्ली, कोलकाता, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईमधील २००२ प्रौढांची पाहणी करण्यात आली.मुंबईची आकडेवारीमुंबईतील ४१ टक्के प्रौढांनी चांगले आरोग्य जपण्याला सर्वाधिक प्राधान्य असल्याचे सांगितले.या प्राधान्याक्रमामध्ये त्यांनी आरोग्याखालोखाल चांगले करिअर व कुटुंबाचे पालनपोषण (१६ टक्के), आर्थिक सुस्थिती (१२ टक्के) व स्वत:च्या मालकीचे घर आणि विश्वभ्रमंती (६ टक्के) यांना महत्त्व दिले.प्राधान्याच्या बाबतीत ६८ टक्के मुंबईकर पालकांना असे वाटत होते की आपल्या स्वत:च्या लसीकरणापेक्षा मुलांसाठीच्या लसीकरणाची अद्ययावत माहिती ठेवणे जास्त महत्त्वाचे आहे.सर्वेक्षणातील नोंदीगंभीर आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा एक परिणामकारक मार्ग आहे यावर भारतातील पाहणीत सहभागी झालेल्या प्रौढांपैकी बहुतेकांचा विश्वास असल्याचे दिसून आले.३४ टक्के व्यक्तींच्या मते त्या केवळ प्रवासासाठी आवश्यक असतात.२६ टक्के व्यक्तींना असे वाटते की निरोगी आणि आरोग्यपूर्ण जीवन जगणाºयांना लसीकरणाची गरज नसते.१९ टक्के व्यक्तींच्या मते लसीकरण हे केवळ वयस्कर लोकांसाठी असते.सहभागी झालेल्या व्यक्तींपैकी ४३ व्यक्तींनी आपल्याला प्रौढांसाठीच्या लसीकरणाविषयी अजिबातच ज्ञान नसल्याचे सांगितले.पाहणीत सहभागी झालेल्या व्यक्तींपैकी ३१ टक्के प्रौढांना गेल्या पाच वर्षांमध्ये लसीकरणाविषयी कोणतीही माहिती मिळालेली नव्हती.८ ते ६४ वर्षे या वयोगटासाठी धनुर्वात, हेपेटायटिस ए आणि बी, इन्फ्लुएन्झा आणि एचपीव्ही ही लसीकरणे सर्वाधिक लागू असल्याचे मत ४५ ते ५० टक्के प्रौढांनी नोंदवले.