Join us

बहुस्तरीय शिक्षणाचा अभाव

By admin | Updated: January 25, 2015 01:12 IST

विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची खंत अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.

मुंबई : आज शैक्षणिक संस्था सर्वंकष वातावरणातील बहुस्तरीय अध्ययनाचे पर्याय उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची खंत अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कलिना कॅम्पसमधील स्पोटर््स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या कार्यक्रमात ६0 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर उपस्थित होते. डॉ. काकोडकर म्हणाले, की आपल्या अवतीभोवती होणाऱ्या स्थित्यंतरांविषयी आपण जागरूक राहणे आवश्यक आहे. या स्थित्यंतरांचे दुष्परिणाम टाळत त्यांचा लाभ सर्वांपर्यंत पोहचविला पाहिजे. स्पर्धात्मक जगात काही संधी तसेच धोकेही निर्माण होत आहेत. या दोन्होंमध्ये जर नीट, विचारपूर्वक योजना आखल्या गेल्या नाहीत, तर विषमता निर्माण होऊन भारतीय मूल्यव्यवस्था धोक्यात येईल, विद्यापीठातील संशोधन जागतिक दर्जाचे असले पाहिजे. तसेच अध्यापक वर्गाने मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्याकरिता एकत्रित यायला हवे़ तंत्रज्ञान शिक्षणाचे रूपांतर मानवी संसाधन निर्मितीच्या प्रक्रियेसाठी करणे आवश्यक आहे; जेणेकरून प्रत्येक युवकामध्ये केवळ नोकरदार म्हणून राहण्यापेक्षा उत्तम कार्यवाहक होण्याची क्षमता निर्माण होईल. आजच्या काळात हे घडणे अत्यंत गरजेचे असून, ते आपल्या मूल्यव्यवस्थेशी साधर्म्य राखणारे असेल. त्याच वेळेला आपल्या शिक्षण पद्धतीने उद्याच्या गरजा जाणून घ्यायला हव्यात, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी विद्यापीठाचे प्र -कुलगुरू डॉ. नरेश चंद्रा यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला.तंत्रज्ञान शिक्षणाचे रूपांतर मानवी संसाधन निर्मितीच्या प्रक्रियेसाठी करणे आवश्यक आहे; जेणेकरून प्रत्येक युवकामध्ये केवळ नोकरदार म्हणून राहण्यापेक्षा उत्तम कार्यवाहक होण्याची क्षमता निर्माण होईल.