Join us  

किटपेटी निवृत्तीनंतरही सोबत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 6:04 AM

पोलीस दलात रुजू झाल्यापासून सेवानिवृत्तीपर्यंतच्या दीर्घ प्रवासात अधिकारी व अंमलदारांच्या सोबत असणारी किट पेटी (ट्रंक) आता आयुष्यभर त्यांच्यासोबत राहील.

जमीर काझी ।मुंबई : पोलीस दलात रुजू झाल्यापासून सेवानिवृत्तीपर्यंतच्या दीर्घ प्रवासात अधिकारी व अंमलदारांच्या सोबत असणारी किट पेटी (ट्रंक) आता आयुष्यभर त्यांच्यासोबत राहील. निवृत्तीनंतर ती पोलीस मुख्यालयात जमा करण्याची सक्ती रद्द करण्यात आली आहे. ३०-३५ वर्षांच्या प्रवासात सोबत असणाºया पेटीशी भावनिक नाते जोडले गेल्याने निवृत्तीनंतर त्यांना ती भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पोलीस मुख्यालयात मध्यवर्ती पोलीस कल्याण निधी समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्य पोलीस दलातील दोन लाखांवर पोलीस अंमलदारांना ती आठवण म्हणून जवळ बाळगता येईल.खात्यात भरती झाल्यानंतर प्रत्येक पोलीस उपनिरीक्षक व कॉन्स्टेबलना खात्याकडून मिळालेले गणवेष किट ठेवण्यासाठी मजबूत लोखंडी पेटी दिली जाते. त्याला गणवेष किट असे संबोधतात. अंमलदाराने गणवेष, टोपी, बॅच, आदी दैनंदिन वापराचे साहित्य त्याला एकत्र ठेवता यावे, जेणेकरून नियुक्तीच्या ठिकाणी गेल्यास त्याला आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे, हा त्यामागचा हेतू आहे. ब्रिटिश काळापासून ही पद्धत आहे. खात्यात कार्यरत असेपर्यंत सुमारे ३५ ते ३८ वर्षे ही पेटी पोलिसांच्या सोबतच असते.निवृत्तीनंतर ती अंमलदारांना मिळावी, अशी मागणी नांदेडमधील साहाय्यक फौजदार ढगे यांनी केली होती. मध्यवर्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावावर चर्चा झाली. पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी पोलीस नियमावलीतील भाग २ नियम १०(५)मधील तरतुदीनुसार घटकप्रमुखांनी त्याबाबत निर्णय घ्यावा, किटपेटी इतरांना वापरण्यायोग्य नसल्यास ती संबंधित अंमलदारांकडे राहू देण्यात यावी, असे निर्देश दिले.>घटकप्रमुखांना दिले अधिकारपोलिसांना किटपेटी सदैव वापरावी लागत असल्याने त्याच्याशी एक भावनिकता निर्माण होते. एवढ्या वर्षांनंतर ती अन्य कोणासाठी उपयोगी नसल्याने ती संबंधित कर्मचाºयाला देण्याबाबत घटकप्रमुखांना अधिकार देण्यात आला आहे, असे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी सांगितले.