Join us  

Kisan Long March : बळीराजाला डबेवाल्यांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 6:13 AM

किसान मार्चसाठी आझाद मैदानात दाखल झालेल्या बळीराजाला मुंबईच्या डबेवाल्यांनीही साथ देत, त्यांना मदतीचा हात दिला.डबेवाल्यांनी शेतकºयांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे.

मुंबई : किसान मार्चसाठी आझाद मैदानात दाखल झालेल्या बळीराजाला मुंबईच्या डबेवाल्यांनीही साथ देत, त्यांना मदतीचा हात दिला.डबेवाल्यांनी शेतकºयांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. कारण शेतकरी जगला, तरच आपण जगू शकू, अशी प्रतिक्रिया डबेवाले संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. डबेवाला जरी मुंबईत काम करत असला, तरी त्याचा पिंड हा शेतकºयाचा आहे, असे ते म्हणाले. मोर्चाच्या दरम्यान डबेवाल्यांच्या रोटी बँकनेही मदत केली. या बँकेच्या माध्यमातून भुकेलेल्यांना अन्न वाटप केले जाते. डबेवाल्यांनी सोमवारी या माध्यमातून जवळपास ५०० हून अधिक शेतकºयांना पावभाजीचे वाटप केले. त्यांच्यासाठी पाण्याचीही विशेष सोय करण्यात आली होती. सर्व शेतकºयांची सोय करणे जमले नाही. मात्र, या मोर्चात खारीचा वाटा उचलल्याचे समाधान डबेवाल्यांना असल्याचे त्यांनी सांगितले.