बांबू-पत्र्याच्या छपराखाली सुरु झालेली कीर्तन संस्था झाली ८० वर्षांची  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 02:56 PM2020-09-12T14:56:43+5:302020-09-12T14:58:41+5:30

अखिल भारतीय कीर्तन संस्थेची ८० वर्षांची वाटचाल

The kirtan institute started under the roof of bamboo leaves is 80 years old | बांबू-पत्र्याच्या छपराखाली सुरु झालेली कीर्तन संस्था झाली ८० वर्षांची  

बांबू-पत्र्याच्या छपराखाली सुरु झालेली कीर्तन संस्था झाली ८० वर्षांची  

Next
ठळक मुद्देघरबसल्या कीर्तनकार व्हा कीर्तनाचे आता ऑनलाईन वर्ग सुरू आहेत.संस्थेचे संकेतस्थळ www.keertansanstha.in

सहस्त्रचंद्र दर्शन योग एका संस्थेचा

मुंबई : स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यावेळी सामाजिक प्रबोधनासाठी कीर्तन आणि नाटक हीच दोन माध्यमे होती. त्यावेळी कीर्तन हे प्रभावी माध्यम होते आणि आज देखील प्रभावी आहे, हे सिद्ध केलेल्या अखिल भारतीय कीर्तन संस्थेला यंदा ८० वर्षे पूर्ण होत असून, दादर येथील ही वास्तू स्वतःच एक इतिहास आहे. संस्थेने आध्यात्मिकतेबरोबर सामाजिक प्रबोधनाची सांगड घातली असून, देश-विदेशात संस्थेचा लौकिक आहे.

१९४० साली श्रावण वद्य पंचमीला या संस्थेची स्थापना दादरमध्ये करण्यात आली. संस्थेचे आद्य संस्थापक शंकरराव ब. कुलकर्णी आणि हरि भक्ती परायण गो. ग. भोसेकर बुवा हे आहेत. श्रीमंत राजेसाहेब औंधकर यांच्या अध्यक्षतेखाली दादर येथे पहिली कीर्तन परिषद भरवली आणि एका प्रस्तावानुसार अखिल भारतीय कीर्तन संस्था स्थापन होऊन तिचे कार्य केवळ दादर किंवा मुंबईपुरते नव्हे महाराष्ट्र पातळीवर सुरू झाले. सुरूवातीला संस्था एका बांबू- पत्र्याच्या तात्पुरत्या छपराखाली सुरु झाली.

अखिल भारतीय कीर्तन संस्थेची १९४० मधे सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली. १९५८ साली  विजयादशमीच्या दिवशी त्यावेळी विश्वस्त प्रमुख असलेले मंत्री डॉ. त्रिं . रा. नरवणे याच्या हस्ते नवीन वा्स्तूसाठी भूमिपूजन करण्यात आले. वास्तू निर्माण झाल्यावर १९६० साली श्रीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उद्योगपती वामनराव लक्ष्मणराव डहाणुकर यांच्या हस्ते झाली. ह.भ.प. भोसेकर, मारुलकर, महाजन गुरुजी, प्रकाशकर शास्त्री, वझे, रा. भागवत यांनी अनेक वर्षे अध्यापनाचे कार्य मोठ्या जिद्दीने आणि तळमळीने केले. संगीताची बाजू देवधर गुरुजी आणि ग. बा. साधले यांनी समर्थपणे सांभाळली होती.

संस्थेच्या कायम वास्तूची उभारणी १९६० साली झाली. १९९०-१९९४ दरम्यान संस्थेने कीर्तनाच्या पूर्वरंग आणि आख्यानाचे कीर्तन रत्नावली भाग १ व २ डॉ. ग. शि. पाटणकर यांच्या संपादनाखाली छापून प्रसिद्ध केले. त्यांच्या चार आवृत्ती निघाल्या. २००० साली संस्थेच्या वास्तूचे पुनर्निर्माण आणि विस्तार कार्य तत्कालीन अध्यक्ष सुरेश उपाध्ये आणि सरकार्यवाह किशोर साठे यांच्या प्रयत्नाने साकारले गेले. २००१ मध्ये कीर्तन विद्यालयाचे नामकरण साई सत्चरीत्रकार हेमाडपंत कीर्तन विद्यालय असे करण्यात आले.

 

Web Title: The kirtan institute started under the roof of bamboo leaves is 80 years old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.