Join us  

किंग्ज सर्कल पादचारी पूल अखेर खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 1:06 AM

प्रवाशांना मोठा दिलासा । जून २०१९ पासून होता बंद; दुरुस्तीचा खर्च दीड कोटी रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मोठ्या दुरुस्तीनिमित्त गेले आठ महिने बंद असलेला किंग्ज सर्कल येथील पादचारी पूल अखेर शनिवारपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील दोन पादचारी पूल जून, २०१९ पासून बंद करण्यात आले होते़ यापैकी या मार्गावरील दक्षिणेकडील पूल सुरू करून प्रवाशांना मोठा दिलासा देण्यात आला आहे़२०१४ मध्ये महापालिकेने नेमलेल्या स्ट्रक्चर आॅडिटरमार्फत मुंबईतील सर्व पुलांची तपासणी करण्यात आली़ यामध्ये किंग्ज सर्कल येथील पादचारी पुलाच्या किरकोळ दुरुस्तीची शिफारस करण्यात आली होती़ मात्र, छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळल्यानंतर सर्व पुलांचे पुन्हा आॅडिट करण्यात आले़ हिमालय पुलाच्या किरकोळ दुरुस्तीची शिफारस करणाऱ्या डी. डी. देसाई या स्ट्रक्चरल आॅडिटरने किंग्ज सर्कल पुलाचीही किरकोळ दुरुस्तीची शिफारस केली होती़हिमालय पादचारी पूल कोसळल्यानंतर महापालिकेने जून, २०१९मध्ये किंग्ज सर्कल येथील दोन्ही पादचारी पूल बंद केले़ त्यामुळे रेल्वे स्थानकावर जाण्यास प्रचंड गैरसोय होत असल्याने प्रवाशांनी निदर्शनेही केली होती़ मात्र, पुन्हा आॅडिट केल्यानंतर डॉ़ आंबेडकर मार्गावरील दक्षिणेकडील पुलाची मोठी दुरुस्ती, तर दुसºया पादचारी पुलाची पुनर्बांधणी करण्याची शिफारस करण्यात आली होती़च्धोकादायक ठरलेल्या २९ पुलांची पुनर्बांधणी, ४७ पुलांची मोठी दुरुस्ती आणि १८४ पुलांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी सन २०२०-२०२१ या आर्थिकवर्षात ७९९़६५ कोटींचीतरतूद करण्यात आलीआहे़च्किंग्ज सर्कल येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील दक्षिणकेकडील पादचारी पुलाची किरकोळी दुरुस्तीची शिफारस स्ट्रक्चरल आॅडिटर डी़ डी़ देसाई यांनी केली होती़ मात्र, पुन्हा आॅडिट केल्यानंतर त्यात मोठ्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे समोर आले़च्दोन्ही पादचारी पूल दोन दशकांपूर्वी बांधण्यात आले आहेत़ मात्र, यापैकी एका पुलाची मोठी दुरुस्ती तर दुसºयाच्या पुनर्बांधणीची शिफारस करण्यात आलीआहे़च्किंग्ज सर्कल येथील दक्षिणेकडील पुलाची दुरुस्ती अंतिम टप्प्यात असून, केवळ किरकोळ कामे शिल्लक आहेत़ मात्र, पूल बंद असल्याने गेल्या काही महिन्यांपासून पादचारी विशेषत: प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे़ त्यामुळे हा पूल शनिवारी तातडीने सुरू करण्यात आला, असे स्थानिक नगरसेविका नेहल शाह यांनी सांगितले़