Join us  

झाडांचे मारेकरी मोकाटच,केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद, सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 2:38 AM

- गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई : कांदिवली येथील दोन माडांची निर्दयपणे कत्तल करण्यात आल्याप्रकरणी दखलपात्र गुन्हा (एफआयआर) दाखल करणार असल्याचा दावा पालिका आर दक्षिणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला होता. मात्र याच वॉर्डच्या उद्यान विभागाने माडाच्या मारेकºयाविरोधात केवळ अदखलपात्र (एनसी) गुन्ह्याची नोंद करत संंबंधितावर मेहेनजर दाखवली आहे. परिणामी या प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.आर-दक्षिण विभागातील उद्यान विद्या साहाय्यक चैत्रा मावची यांनी माडांची कत्तल करण्यात आल्याप्रकरणी बुधवारी कांदिवली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. अनधिकृत बांधकामाला अडथळा ठरणाºया दोन माडांच्या मुळामध्ये कंत्राटदार निझामुद्दीन खान याने सिमेंट घालून त्यातील एका माडाच्या झावळ्या बेकायदेशीररीत्या छाटल्या. यासाठी उद्यान विभागाने त्याला कोणतीही परवानगी दिली नव्हती, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे. सिमेंट घातल्यावर हळूहळू दोन्ही माड पूर्णपणे सुकून जातील आणि अगदी सहजरीत्या ते कापून हटवता येतील, असा खानचा उद्देश असल्याचा आरोप उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस (स्लम सेल)चे प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते अजय शुक्ला यांनी केला होता. खानने माडाच्या झाडाची इतक्या निर्दयपणे कत्तल करूनही उद्यान विभागाकडून केवळ ‘एनसी’ दाखल करण्यात आल्याप्रकरणी निसर्गप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.दुसरीकडे ‘आम्ही या प्रकरणी सध्या एनसी दाखल केली आहे. न्यायालयातून आदेश घेऊन नंतर याबाबत एफआयआर दाखल करणार आहोत,’ अशी माहिती साहाय्यक उद्यान अधीक्षक माने यांनी दिली.पत्र ‘चारकोप’ला, तक्रार ‘कांदिवली’तआर-दक्षिणच्या उद्यान विभागाने चारकोप पोलिसांना एक लेखी पत्र दिले होते. यात माडाच्या कत्तलीप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे म्हटले होते. याबाबत त्यांनी साहाय्यक आयुक्त संजय कुºहाडे आणि उपायुक्त किरण खैरे यांना कळविले होते.मात्र माडाची कत्तल झालेला एकतानगर हा विभाग कांदिवली पोलिसांच्या हद्दीत येतो, ज्या ठिकाणी अखेर एनसी दाखल करण्यात आली. त्यामुळे उद्यान विभागाने वेळकाढूपणा करत वरिष्ठ अधिकारी खैरे आणि कुºहाडे यांचीही दिशाभूल केली का, असा प्रश्न शुक्ला यांनी उपस्थित केला आहे.- अभिनेते ऋषी कपूर यांनीही झाडांची छाटणी केल्याप्रकरणी त्यांच्यावर आणि त्यांच्या कंत्राटदारावर खार पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. यासाठी संबंधित विभागाकडून आवश्यक ती परवानगी घेतली होती, असे स्पष्टीकरण कपूर यांनी दिले होते. मात्र तरीदेखील खार पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला. त्यामुळे माडांच्या हत्या प्रकरणाचे गांभीर्य पालिकेच्या आर-दक्षिण विभागाला अद्याप समजलेले नाही, असेच चित्र आहे.वृक्ष संवर्धन आणि जतन कायदा, १९७५ च्या कलम २१ प्रमाणे झाड लावलेली जागा कायदेशीर परवानगीशिवाय बळकावणे चुकीचे आहे. अनधिकृतपणे झाडांच्या कत्तलीप्रकरणी कमीत कमी १ हजार तर जास्तीत जास्त ५ हजार रुपये दंड आणि एक आठवडा ते वर्षभराच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. कांदिवलीतील माड कत्तलप्रकरणी पोलिसांनी सध्या एनसी दाखल केली आहे. न्यायालयाच्या परवानगीने या अदखलपात्र गुन्ह्याची दखलपात्र गुन्ह्यात नोंद होणे गरजेचे आहे.- अ‍ॅड. विशाल सत्यप्रकाश सक्सेनाजागा बळकावण्यासाठी कंत्राटदार झाडांची कत्तल करतात. त्यांच्या विरोधात पालिकेने पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला पाहिजे. मात्र तसे न करता एनसी दाखल केल्याने झाडांचे मारेकरी अगदी सहजपणे या प्रकरणातून सुटतात. त्यामुळे निसर्गाचा ºहास होत चालला आहे.- सारथी गुप्ता, पर्यावरणवादी

टॅग्स :मुंबई