Join us  

प्रियकरच निघाला मारेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बीकेसी येथे सापडलेल्या तरुणीच्या हत्येमागे तिचा प्रियकरच असल्याचे बीकेसी पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बीकेसी येथे सापडलेल्या तरुणीच्या हत्येमागे तिचा प्रियकरच असल्याचे बीकेसी पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आले आहे. पूर्ण पगार हातात न दिल्यास बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती प्रेयसीने दाखवल्यामुळे त्याने तिचा काटा काढल्याचे तपासात समोर आले. मोहंमद जलील मोहंमद कलीम शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेली तरुणी वेश्याव्यवसाय करत होती. शेखने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी त्याने पूर्ण पगार तिच्या हाती द्यावा, यासाठी धमकावत होती. तिच्या रोजच्या धमकीला कंटाळून त्याने तिच्या हत्येचा कट आखला. तिला फिरण्यासाठी बीकेसी परिसरात नेले. तेथे दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतर शेखसोबत आणलेल्या चाकूने तिच्या गळ्यावर वार करत हत्या केली. त्यानंतर जवळील नाल्यात मृतदेह फेकून तो पळून गेला.

११ मे रोजी बीकेसी भागात मृतदेह आढळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. परिसरातील ६५ हून अधिक सीसीटीव्हींची पडताळणी केली. ८० हून अधिक जणांचे जबाब नोंदविले. त्यादरम्यान शेखबाबत पोलिसांना माहिती मिळाली. तो उत्तर प्रदेशचा रहिवासी असून, त्याला हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.

..................................................