Join us

हत्या करणाऱ्या आरोपीस अटक

By admin | Updated: August 1, 2014 00:16 IST

लक्ष्मणपूर येथील २३ वर्षीय युवती घरी एकटीच असतांना आरोपीने युवतीला धक्काबुक्की केली. त्यानंतर युवतीने प्रतिकार केल्याने तिची ओढणीने गळा आवळून हत्या करणाऱ्या आरोपीस

लक्ष्मणपूर येथील घटना : ओढणीने गळा आवळून केला होता युवतीचा खूनचामोर्शी : लक्ष्मणपूर येथील २३ वर्षीय युवती घरी एकटीच असतांना आरोपीने युवतीला धक्काबुक्की केली. त्यानंतर युवतीने प्रतिकार केल्याने तिची ओढणीने गळा आवळून हत्या करणाऱ्या आरोपीस चामोर्शी पोलिसांनी गुरूवारी भद्रावती येथून जेरबंद केले आहे. योगेश जागोराव डाहाके (४०) रा. बुद्धविहार भद्रावती असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी योगेश डाहाके हा चामोर्शीतील अपंग निवासी विद्यालयात २००२ ते २०११ पर्यंत कार्यरत होता. त्यानंतर शाळा बंद पडल्याने तो भद्रावतीला मजुरीचे काम करीत होता. योगेश डाहाके हा विवाहीत असून त्याला दोन मुले आहेत. चामोर्शीत कार्यरत असतांना मृतक युवतीशी त्याचे प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी २९ जुलैला दुपारी २.३० वाजता आरोपी व मृतक युवतीमध्ये बाचाबाची झाली. योगेश डाहाके याने युवतीचा गळा ओढणीने आवळला. यात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सदर कारवाई ठाणेदार संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनात डी. एन. गंधेवार, विजय काळबांधे, अंकुश मोडक, साधना मडावी, नितीन पाल यांनी केली आहे.