मुंबई : केईएम रुग्णालयातील निवासी महिला डॉक्टरचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. हा मुंबईतील डेंग्यूचा सहावा बळी आहे. गेल्या आठवडय़ात रुग्णालयातील चार निवासी डॉक्टरांना डेंग्यूची बाधा झाली होती. तर काही कर्मचा:यांना आणि रुग्णांनाही डेंग्यू झालेला आहे.
मूळची पुण्याची असलेली डॉ. श्रुती खोब्रागडे ही अनेस्थेशिया विभागात तिस:या वर्षाला शिकत होती. ताप आल्यावर तिला 2क् ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. आधी तिच्यावर वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. तिची प्रकृती खालावल्यानंतर तिला अतिदक्षता विभागामध्ये हलवण्यात आले. प्लेटलेट्स 2क् हजारार्पयत खाली गेल्या होत्या. त्यानंतर रात्री डॉ. श्रुतीची प्रकृती खालावली. तिला श्वास घेण्यास त्रस होऊ लागला, तिच्या फुप्फुसात पाणी होऊ लागले. तिची प्रकृती जास्तच खालावल्यानंतर तिला 23 ऑक्टोबर रोजी हिंदुजा रुग्णालयात हलवण्यात आले, अशी माहिती सूत्रंकडून मिळाली. हिंदुजा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिची प्रकृती खालावली होती. उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी श्रुतीचा मृत्यू झाला. केईएम रुग्णालयात विविध ठिकाणी पाणी साचलेले आहे, त्यातच बांधकाम सुरू आहे. यंदा केईएम रुग्णालयामध्ये धूर फवारणी झालेली नाही. साचलेल्या पाण्यामुळे वॉर्डमध्ये असलेल्या रुग्णांनाही डेंग्यूची लागण झाली आहे. - आणखी वृत्त/हॅलो
साचलेल्या पाण्यातच डेंग्यूच्या डासांची पैदास
डेंग्यूच्या डासांची पैदास ही स्वच्छ साठलेल्या पाण्यामध्ये होते. अनेक घरांत, कार्यालयांत मनी प्लॉण्ट, फेंगशुईच्या वस्तू असतात, यामधले पाणी
आठवडाभर बदलले जात नाही. एसीचे पाणी, कुंडय़ाखाली ठेवण्यात येणा:या प्लॅस्टिक डिश या ठिकाणी पाणी साठून राहिल्याने डेंग्यूच्या डासांची पैदास होण्याचा धोका वाढतो.