Join us

केडीएमसी नगरसेवकांचा हत्तीवरून अभ्यास

By admin | Updated: November 26, 2014 02:06 IST

तब्बल 33 लाख रूपये खर्ची घालून आयोजित करण्यात आलेल्या केरळ दौ:यावरील नगरसेवकांची हा हा अनोखा अभ्यास सोशल मीडियामुळे चव्हाटय़ावर आली आहे.

कल्याण: हत्तीवरून सफारी, जहाजासमोर फोटो सेशन.. हे कोणत्याही सहलीचे वर्णन नाही. हा आहे केडीएमसीच्या नगरसेवकांचा अभ्यास दौरा. तब्बल 33 लाख रूपये खर्ची घालून आयोजित करण्यात आलेल्या केरळ दौ:यावरील नगरसेवकांची हा हा अनोखा अभ्यास सोशल मीडियामुळे चव्हाटय़ावर आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकांनी गेल्या चार वर्षात विविध अभ्यास दौरे केले आहेत. त्यातून काय साधल, हा संशोधनाचा मुद्दा असताना यंदा नगरसेवक केरळ दौ:यावर रवाना झाले आहेत. या दौ:यात काहींनी गज सफारीचा आनंद लुटला तर काहीजण अलिशान क्रुझ जहाजाच्या जवळ फोटो सेशन करण्यात मग्न झाले. त्यामुळे नगरसेवकांचा हा अनोखा ‘अभ्यास’चर्चेचा विषय ठरला आहे.
केडीएमसीच्या 1क्7 नगरसेवकांपैकी 55 नगरसेवक अभ्यास दौ:याच्या निमित्ताने शनिवारी केरळला मार्गस्थ झाले. तेथील विविध विकास प्रकल्पांसह त्रिवेंद्रम महापालिकेला भेट दिली जाणार आहे, मात्र सोशल मीडीयामुळे समोर आलेल्या छायाचित्रंवर महापालिका वतरुळासह शहरात सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. (प्रतिनिधी)
 
कोटय़वधींची उधळपट्टी
गेल्या चार वर्षात अभ्यासदौरे आणि प्रकल्प पाहणीच्या निमित्ताने गोवा, राजस्थान, गुजरात, हैद्राबाद, बेंगळुरू या विविध राज्य व शहरांना नगरसेवकांनी भेटी दिल्या. त्यावर 63 लाखांचा खर्च झाला आहे. केरळ दौ:यावर 33 लाख रुपये उधळण्यात आले आहेत. या दौ:यांतील अभ्यासाचे फलित शहरातील विकासकामांत दिसणो आवश्यक होते. परंतु ही शहरे दिवसेंदिवस अधिकाधिक बकाल होत आहेत. त्यामुळे हे अभ्यास दौरे केवळ नावाला असून त्याऐवजी नगरसेवक करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.