Join us

‘कथ्थक क्वीन’ सितारादेवींचे निधन

By admin | Updated: November 26, 2014 02:54 IST

भारतीय नृत्यकलेच्या प्रांतात ‘कथ्थक क्वीन’ असे सार्थ नामाभिमान लाभलेल्या आणि कथ्थकला देश-विदेशात प्रतिष्ठा मिळवून देणा:या ज्येष्ठ नृत्यगुरू सितारादेवी (94) यांचे मंगळवारी निधन झाले.

मुंबई : भारतीय नृत्यकलेच्या प्रांतात ‘कथ्थक क्वीन’ असे सार्थ नामाभिमान लाभलेल्या आणि कथ्थकला देश-विदेशात प्रतिष्ठा मिळवून देणा:या ज्येष्ठ नृत्यगुरू सितारादेवी (94) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने कथ्थक कलेचा आधारस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला आहे. तब्बल सहा दशके त्यांनी कथ्थकच्या प्रांतात स्वत:चा ठसा उमटविला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना ‘नृत्य सम्राज्ञी’ ही उपाधी बहाल केली होती. सितारादेवी यांचा मुलगा परदेशातून परतल्यावर गुरुवारी, 27 नोव्हेंबरला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.