Join us

करुणा म्हणे धनंजय मुंडे यांनी माझ्या मुलांना डांबून ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:28 IST

पोलीस आयुक्तांकड़े लेखी तक्रार, आमरण उपोषणाचा इशाराधनंजय मुंडे यांनी माझ्या मुलांना डांबून ठेवलेकरुणाचा आराेप; आयुक्तांकडे लेखी ...

पोलीस आयुक्तांकड़े लेखी तक्रार, आमरण उपोषणाचा इशारा

धनंजय मुंडे यांनी माझ्या मुलांना डांबून ठेवले

करुणाचा आराेप; आयुक्तांकडे लेखी तक्रार, आमरण उपोषणाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील कथित बलात्कार प्रकरण शांत होत असताना करुणा यांनी पोलिसांत धाव घेतली. मुंडे यांनी आपल्या दोन मुलांना गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्या घरात डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुलांची भेट न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देऊन त्यांनी पोलिसांकडे कारवाई करण्याची विनंती केली आहे.

करुणा यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात दिलेल्या अर्जामध्ये, ‘माझे पती धनंजय मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यांपासून माझ्या दोन मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात लपून ठेवले आहे. २४ जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बंगल्यावर जाताच, मुंडे यांनी ३० ते ४० पोलिसांना बोलावून मला हाकलून लावले. बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नाहीत. त्यात १४ वर्षांच्या मुलीचाही समावेश असून महिला केअरटेकरही नाही. मुंडे त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करतात. माझ्या मुलांसोबत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असतील. माझ्या विरोधातही ते मुलांना भडकवत आहेत. माझ्या मुलांसोबत भेट घालून दिली नाही तर २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. चित्रकूट बंगल्यासमोर किंवा मंत्रालय आणि आझाद मैदान येथे उपोषणासाठी परवानगी द्या, मुंडे यांच्यावर कठोर कारवाई करा’, अशी विनंती केली आहे.

.......................

....

कोण आहे करुणा?

मुंडे यांच्यावरील कथित बलात्कार प्रकरण समोर आल्यानंतर आपली भूमिका मांडताना, करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. शर्माची मी सर्वतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी आणि त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत. मात्र २०१९पासून करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्यासुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मादेखील सहभागी होता. असे नमूद केले होते.

....