Join us  

कांदिवलीत जलवाहिनी फुटली

By admin | Published: May 29, 2016 1:48 AM

कांदिवली पश्चिमेकडील लालजीपाडा परिसरात इंदिरानगर मार्गावर शनिवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास जलवाहिनी फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले. येथे कचरा

मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील लालजीपाडा परिसरात इंदिरानगर मार्गावर शनिवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास जलवाहिनी फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले. येथे कचरा साफ करण्याचे काम सुरू असताना ही जलवाहिनी फुटली असून, सायंकाळी सहा वाजेपर्यंत जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली नव्हती. महत्त्वाचे म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून येथील कचरा उचलण्यात आला नव्हता. मात्र वारंवार करण्यात आलेल्या तक्रारीनंतर कचरा उचलण्यासाठी येथे जेसीबी वाहन दाखल झाले. परंतु कचरा उचलण्याच्या कारवाईवेळी जलवाहिनी फुटण्याची घटना घडली. स्थानिकांकडून या घटनेची माहिती नगरसेवकाला देण्यात आली. नगरसेवकाच्या कार्यालयातून ही माहिती आर-दक्षिणच्या जल विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र तरीही जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी काहीच कारवाई करण्यात आली नाही, असे स्थानिक रहिवासी सुरेंद्र दुबे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)