Join us

कांदिवलीत स्टंटबाजी करणाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:09 IST

मुंबई : कांदिवलीत दारू पीत गाडी चालविणाऱ्या आणि जीवघेणे स्टंट करणाऱ्या तीन तरुणांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी ...

मुंबई : कांदिवलीत दारू पीत गाडी चालविणाऱ्या आणि जीवघेणे स्टंट करणाऱ्या तीन तरुणांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी तपासाअंती तिघांना शुक्रवारी अटक केली.

....................................................

किरकोळ वादातून हल्ला; तिघांवर गुन्हा

मुंबई : डोंगरी परिसरात राहणारे समीर सुरती (१८) यांचा भाऊ हमाम यांच्यावर किरकोळ वादातून हल्ला चढविण्यात आल्याची घटना बुधवारी घडली होती. या प्रकरणी पाेलिसांनी फैज मुन्शी, शमीम मुन्शी, शकील मुन्शी यांच्या विरोधात मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

...............................................

दुचाकीच्या धकडेत पादचाऱ्याचा मृत्यू

मुंबई : जे. जे. मार्ग पोलिसांच्या हद्दीत भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी अहमद अली मोहम्मद हुसैन (४६) यांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी हा अपघात घडला. या प्रकरणी जे. जे. मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद करीत अधिक तपास सुरू केला आहे.

....................................................

नाल्यातील गाळ काढण्याची स्थानिकांची मागणी

मुंबई : गोरेगावच्या प्रभाग क्रमांक ५७ मध्ये मोडणाऱ्या इंदिरानगर येथील नाल्यातील गाळ अद्याप काढण्यात आलेला नाही. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नाल्यातील गाळ काढून ताे साफ करण्याची मागणी स्थानिकांनी संबंधितांकडे केली आहे.

............................................

मराठीचा वापर करा; रेल्वे व्यवस्थापकांना पत्र

मुंबई : कोकण रेल्वेचे फलक, जाहिराती, पत्रकांवर मराठीचा वापर हाेत नसल्याची तक्रार आनंदा पाटील यांनी ‘आपले सरकार’ प्रणालीवर केली होती. त्याची दखल घेत मराठीचा वापर करण्याची सूचना मराठी भाषा विभागाने कोकण रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकांना पत्राद्वारे केली आहे.

...............................