न्या. भूषण धर्माधिकारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 06:37 AM2020-03-19T06:37:35+5:302020-03-19T06:38:40+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी न्या. भूषण धर्माधिकारी यांच्या नावाची अखेर घोषणा करण्यात आली.

 Justice Bhushan Dharmadhikari Chief Justice of mumbai high Court | न्या. भूषण धर्माधिकारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी

न्या. भूषण धर्माधिकारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी

googlenewsNext

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी न्या. भूषण धर्माधिकारी यांच्या नावाची अखेर घोषणा करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आदेशानंतर केंद्रीय विधि व न्याय मंत्रालयाने याबाबत अधिसूचना काढली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने न्या. भूषण धर्माधिकारी यांच्या नावाची शिफारस केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. प्रदीप नंदराजोग फेब्रुवारीमध्ये निवृत्त झाल्यानंतर न्या. भूषण धर्माधिकारी यांची प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २४ तासांत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने न्या. भूषण धर्माधिकारी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची शिफारस केली. २७ एप्रिल रोजी न्या. धर्माधिकारी सेवानिवृत्त होणार आहेत.
मूळचे नागपूरचे असलेले न्या. धर्माधिकारी यांनी नागपूर विद्यापीठातून बी.एस्सी. (जीवशास्त्र), अतिरिक्त बी.ए. (इंग्रजी साहित्य) आणि एल.एल.बी., बी.एस्सीचे शिक्षण घेतले आहे. १९८० मध्ये विधि शाखेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नागपूर न्यायालयातच वकिलीचा सराव सुरू केला. तसेच जबलपूरमध्ये अ‍ॅड. वाय.एस. धर्माधिकारी यांच्याकडे काम केले.

Web Title:  Justice Bhushan Dharmadhikari Chief Justice of mumbai high Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.