प्रकाश आंबेडकरांकडून बाबासाहेबांचा रिपब्लिकन विचार संपविण्याचा घाट, जोगेंद्र कवाडे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 06:40 AM2019-08-15T06:40:47+5:302019-08-15T06:41:00+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन हा राजकीय विचार संपविण्याचा घाट प्रकाश आंबेडकरांकडून वंचित आघाडी मार्फत सुरू असल्याचा गंभीर आरोप पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केला.

Jogendra Kawade accuses Ghat of ending Babasaheb's Republican views by Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकरांकडून बाबासाहेबांचा रिपब्लिकन विचार संपविण्याचा घाट, जोगेंद्र कवाडे यांचा आरोप

प्रकाश आंबेडकरांकडून बाबासाहेबांचा रिपब्लिकन विचार संपविण्याचा घाट, जोगेंद्र कवाडे यांचा आरोप

Next

ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन हा राजकीय विचार संपविण्याचा घाट प्रकाश आंबेडकरांकडून वंचित आघाडी मार्फत सुरू असल्याचा गंभीर आरोप पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केला.

ठाण्यात मंगळवारी एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे हेदेखील उपस्थित होते. प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडी सुरू केली असली तरी त्यात रिपाइंला कुठेच स्थान नसल्याचेही त्यांनी सांगितले. याचा प्रतत्य लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला. त्यांना जर रिपाइंचे विचार वाढवायचे असते तर त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर उमेदवार उभा केला नसता असाही आरोप त्यांनी यावेळी केला. एकूणच भाजपवाली मंडळीच या वंचितला चालवित असल्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या आम्ही महाआघाडीचा घटक आहोत. त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात काँग्रेस, राष्टÑवादीबरोबर जागा वाटपांची चर्चा झाली आहे. मात्र, आमचा सन्मान केला गेला नाही तर मात्र आम्ही स्वबळावर राज्यात ५१ जागा लढवू असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यात कोल्हापूर, सांगली आदींसह इतर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. असे असतांना दुसरीकडे भाजपचे नेते मंडळी शासकीय मदतीच्या पाकिटांवर आपली स्टीकर लावून प्रचार करतांना दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवाय अशी परिस्थिती असतांना मुख्यमंत्री मात्र जनादेश यात्रेत मश्गुल असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. आता ही यात्रा बंद असली तरी ती पुन्हा सुरू होणार आहे.
तिकडे देशाचे गृहमंत्री पूरग्रस्त भागांचा हेलिकॉप्टरद्वारे पाहणी दौरा करून गेले. परंतु, त्यांच्या सोबत मुख्यमंत्री नव्हते. त्यामुळे त्यांना येथील काय परिस्थिती समजणार असा सवालही त्यांनी केला. पूरस्थितीतही भाजप नेत्यांचे सेल्फी काढणे म्हणजे त्यांना सत्तेचा माज आला असून जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणे घेणे नसल्यचे द्योतक आहे.

रिपाइं जनशक्ती महाआघाडीचा
२६ आॅगस्टला नाशिक येथे मेळावा
आता विविध रिपब्लीकन विचारसरणींना एकत्र घेऊन रिपाइं जनशक्ती महाआघाडी स्थापन केली असून त्याचा मेळावा आता २६ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता नाशिक येथे आयोजिल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये विविध रिपाइंच्या संघटनांना एकत्र घेण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Jogendra Kawade accuses Ghat of ending Babasaheb's Republican views by Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.