लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सोन्याच्या दुकानातील भिंतीला मोठे भगदाड पाडून ३१ लाखांची रोकड असलेली तिजोरी लंपास करण्यात आल्याची घटना मालाडमधील काठेवाडी चौकात सोमवारी उघडकीस आली. शेजारील आंबेविक्री करणाऱ्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे. मालाड पूर्वच्या राणी सती मार्गावरील काठेवाडी चौकात सत्यम ज्वेलर्स आहे. सकाळी दहाच्या सुमारास हे दुकान उघडले असता आतील तिजोरी गायब असल्याचे लक्षात आले. दुकानाची भिंत पाडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. तिजोरीत ३१ लाखांची रोकड होती. त्यांनी तातडीने दिंडोशी पोलिसांना कळविले. ‘सत्यम’च्या शेजारचा दुकानगाळा एका व्यक्तीने आंब्याच्या विक्रीसाठी भाडेतत्त्वावर घेतला होता. घटनेनंतर तो पसार झाला असून त्यानेच हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत मूळ दुकान मालकाकडे चौकशी करण्यात येत आहे.
ज्वेलर्समधून ३१ लाखांच्या रोकडसह तिजोरी लंपास
By admin | Updated: June 13, 2017 02:49 IST