Join us

जयंत पाटील यांना विश्रांतीचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:07 IST

मुंबई : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची ब्रीच कँडी रुग्णालयात अँजिओग्राफी चाचणी करण्यात आली. यात कोणताही दोष आढळला नसून ...

मुंबई : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची ब्रीच कँडी रुग्णालयात अँजिओग्राफी चाचणी करण्यात आली. यात कोणताही दोष आढळला नसून लवकरच त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे.

बुधवारी मंत्रिमंडळ बैठकी दरम्यान मंत्री पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची गुरूवारी सकाळी अँजिओग्राफी चाचणी झाली. याबाबत स्वतः पाटील यांनी ट्विट करून माहिती दिली. ‘आज ब्रीच कँडी रुग्णालयात माझी अँजिओग्राफी चाचणी झाली असून त्यात कोणताही दोष आढळलेला नसल्याने काळजीचे कारण नाही. दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानंतर लगेचच जनसेवेत रुजू होण्याचा माझा मानस आहे,’ असे पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, समर्थक आणि हितचिंतकांनी व्यक्त केलेल्या संवेदनांप्रती आभार व्यक्त केले.