Join us  

कंगना रनौतविरोधात जावेद अख्तर यांनी दंडाधिकारी न्यायालयात नोंदविला जबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:20 AM

मुंबई : मानहानी प्रकरणात गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रनौत हिच्याविरुद्ध अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयात गुरुवारी जबाब नोंदविला. ...

मुंबई : मानहानी प्रकरणात गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रनौत हिच्याविरुद्ध अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयात गुरुवारी जबाब नोंदविला. एका मुलाखतीदरम्यान कंगना हिने अख्तर यांच्यावर अनेक आरोप केले. हे आरोप तथ्यहीन असल्याचे म्हणत अख्तर यांनी कंगनाविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. कायदेशीर कार्यवाहीचा एक भाग म्हणून अख्तर यांनी गुरुवारी दंडाधिकारी यांच्यापुढे जबाब नोंदविला.

दाव्यानुसार, कंगनाने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांच्यावर तथ्यहीन आरोप केले. तिच्या या आरोपांमुळे आपली प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातही ठराविक लोकांना लक्ष्य केले. त्यात आपलाही समावेश केला. तसेच तिचे अभिनेता हृतिक रोशनबरोबर असलेल्या कथित प्रेमसंबंधांविषयी कुणालाही सांगू नये, अशी धमकी आपण दिल्याचे कंगनाने म्हटले आहे, असे अख्तर यांनी दाव्यात म्हटले आहे. कंगना रनौतच्या या विधानांमुळे लोकांचे आपल्याविषयी मत बनले आहे. आपली प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे, असे दाव्यात म्हटले आहे.