जावेद अख्तर मानहानी प्रकरण; कंगना रनौतला न्यायालयाची नोटीस, १ मार्चपर्यंत हजर राहण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 04:38 AM2021-02-02T04:38:24+5:302021-02-02T06:55:59+5:30

Kangana Ranaut : गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या फौजदारी मानहानी दाव्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला सोमवारी नोटीस बजावली.

Javed Akhtar defamation case; Court notice to Kangana Ranaut, directed to appear till March 1 | जावेद अख्तर मानहानी प्रकरण; कंगना रनौतला न्यायालयाची नोटीस, १ मार्चपर्यंत हजर राहण्याचे निर्देश

जावेद अख्तर मानहानी प्रकरण; कंगना रनौतला न्यायालयाची नोटीस, १ मार्चपर्यंत हजर राहण्याचे निर्देश

Next

मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या फौजदारी मानहानी दाव्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला सोमवारी नोटीस बजावली. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना घेतलेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर यांची बदनामी केल्याचे दाव्यात म्हटले आहे.
दंडाधिकारी आर. आर. खान यांनी या प्रकरणी जुहू पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी त्यानुसार सोमवारी न्यायालयात अहवाल सादर केला. कंगनावर  केलेल्या आरोपांत तथ्य असल्याने आणखी तपास करावा लागेल, असे पोलिसांनी अहवालात म्हटल्याचे जावेद यांचे वकील कुमार भारद्वाज यांनी न्यायालयाला सांगितले.

अख्तर यांनी केलेल्या दाव्यानुसार, कंगनाने अर्णव यांना  दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर हे बॉलिवूडमधील ‘सुसाईड गॅंग’मध्ये सहभागी होते. काहीही केले तरी ते मोकळे सुटू शकतात, असे म्हटले आहे. तिच्या या आरोपांमुळे जावेद यांची प्रतिमा मलिन झाली असा आराेप त्यांनी केला आहे. यू-ट्यूबवर ही क्लिप खूप पसरली, असा युक्तिवाद भारद्वाज यांनी केला. 

समन्स बजावूनही उत्तर नाही
कंगनाची चौकशी करण्यासाठी पोलीस तिला वारंवार समन्स बजावत आहेत. परंतु, ती त्याला उत्तर देत नाही, अशी माहिती भारद्वाज यांनी दंडाधिकाऱ्यांना दिली. त्यांचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने कंगनाला नोटीस बजावली. १ मार्चपर्यंत न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायालयाने कंगनाला दिले.

Web Title: Javed Akhtar defamation case; Court notice to Kangana Ranaut, directed to appear till March 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.