Join us  

‘इस्माईल युसूफ’वर नापास विद्यार्थ्यांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 2:22 AM

जोगेश्वरीतील इस्माईल युसूफ महाविद्यालयातील बारावीच्या निकालातील विज्ञान शाखेतील ५०टक्के विद्यार्थी बारावी विज्ञान शाखेत नापास झाले आहेत.

मुंबई : जोगेश्वरीतील इस्माईल युसूफ महाविद्यालयातील बारावीच्या निकालातील विज्ञान शाखेतील ५०टक्के विद्यार्थी बारावी विज्ञान शाखेत नापास झाले आहेत. महाविद्यालय प्रशासनाने प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण वेळेत शिक्षण मंडळाकडे पाठविले नसल्याने एवढ्या मोठ्यासंख्येने विद्यार्थी नापास झालेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनकडून करण्यात येत आहे. मात्र महाविद्यालय स्तरावर या संदर्भातील तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने संतप्त विद्यार्थी-पालकांनी न्यायासाठी सोमवारी दुपारी मंत्रालयात धडक दिली. इस्माईल युसूफ कनिष्ठ महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून ३११ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते, त्यापैकी १५७ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. आणि महाविद्यालयाचा निकाल ५० टक्के लागला आहे. तर तब्बल १५४ विद्यार्थी नापास झाले आहेत. अनेकांनी तर महाविद्यालयाकडून देण्यात येणारे गुणच बोर्डाकडे जमा न केल्याच्या तक्रारी केल्या आहेत. मात्र महाविद्यालयाने यासंदर्भात सर्व गुणपत्रे आम्ही त्यावेळी विभागीय मंडळाकडे जमा केली आहेत असे सांगून हात वर केले आहेत़

टॅग्स :महाविद्यालय