Join us  

कपिल शर्मानंतर इरफान खानचेही अनधिकृत बांधकाम? बीएमसीने पाठवली नोटीस

By admin | Published: September 12, 2016 6:26 AM

विनोदवीर कपिल शर्मानंतर अभिनेता इरफान खानला फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी बीएमसीने नोटीस पाठवली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १२ : विनोदवीर कपिल शर्मानंतर अभिनेता इरफान खानला फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी बीएमसीने नोटीस पाठवली आहे. बीएमसीचा आरोप आहे की, इरफानने त्याच्या गोरेगाव इथल्या फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केलं आहे. या अपार्टमेंटधील अनेकांना पालिकेने नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे इरफान जिथे राहतो त्याच इमारतीत कपिल शर्माचा देखील फ्लॅट आहे. कपिल शर्मा नवव्या मजल्यावर राहतो तर इरफान पाचव्या मजल्यावर राहतो. २०१४ मध्ये बीएमसीला त्यांना याबाबतची तक्रार मिळाली होती. त्यानुसार या दोघांच्याही घरातील एलिवेशन फीचर, डक्ट, कॉमन पॅसेज आणि पार्किंग या ठिकाणी केलेल्या बदलांसाठी पालिकेची परवानगी घेतली नसल्याचं या नोटीसमध्ये स्पष्टपणे म्हंटलं आहे. त्यानंतर नोटीस पाठवण्यात आली होती. याबाबतची ओशिवरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.दरम्यान, शुक्रवारी पहाटे ५ वाजून ५३ मिनिटांनी कपिल शर्माने मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे लाच मागितल्याचे टिष्ट्वट केले. मात्र कार्यालयाच्या बांधकामासाठी लाच मागितल्याचे कपिल ने ट्विट केलं होतं. दिवसभर ट्विटर आणि राजकिय तथाकथित चर्चेला इधान आले. मात्र कपिलचे ते कार्यालयच अनधिकृत असल्याचे समोर आले. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेनेही कपिल याला पत्र पाठवत लाचखोर अधिकाऱ्याच्या नावाचा खुलासा करावा. त्यामुळे आम्हाला योग्य ती कारवाई करता येईल, असेही म्हटले. शिवसेना आणि मनसेने केलेल्या टीकेनंतर शुक्रवारी रात्री कपिल याने पुन्हा आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला असला तरी अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी कपिलने केलेला कांगावा यानिमिताने लोकांसमोर उघड झाला आहे.कपिलने केलेल्या टिष्ट्वटमुळे सोशल नेटवर्क साइट्सवर झालेला धुमाकूळ, महापालिकेने केलेली सारवासारव, राजकीय पक्षांनी कपिलवर केलेले आरोप आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचे महापालिकेला केलेले आवाहन; या घडामोडींमुळे सेलीब्रिटींना एखाद्या प्रशासनाने किती महत्त्व द्यावे? हा मुद्दाही यानिमित्ताने पुढे आला आहे.