Join us  

उपाय सुचविण्यासाठी तज्ज्ञांचे पथक नेमा, उच्च न्यायालयाचे आयआयटी-‘बी’ला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 1:25 AM

भूस्खलनामुळे वडाळा येथील लॉइड इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. यापुढे या ठिकाणचे आणखी नुकसान होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविण्यासाठी तज्ज्ञांचे पथक नियुक्त करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने आयआयटी-बीच्या संचालकांना शनिवारी दिले.

मुंबई : भूस्खलनामुळे वडाळा येथील लॉइड इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. यापुढे या ठिकाणचे आणखी नुकसान होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविण्यासाठी तज्ज्ञांचे पथक नियुक्त करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने आयआयटी-बीच्या संचालकांना शनिवारी दिले.दोस्ती रिअ‍ॅल्टीला उंच इमारत बांधण्यासाठी महापालिकेने दिलेल्या परवानगीला दोस्ती ब्लॉसम या इमारतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे होती.दोस्ती रिअ‍ॅल्टीच्या बांधकामांमुळे आजूबाजूच्या इमारतींना तडे गेले आहेत, असे याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील अतुल दामले यांनी न्यायालयाला सांगितले.इमारतीचे आणखी नुकसान होऊ नये, यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने काम करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली. तसेच दोस्ती रिअ‍ॅल्टीला बांधकामासाठी दिलेली परवानगी रद्द करावी, अशीही विनंती रहिवाशांनी केली आहे. शुक्रवारच्या सुनावणीत पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी दोस्ती रिअ‍ॅल्टीला ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावल्याची माहिती न्यायालयाला दिली.

टॅग्स :न्यायालय