आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 06:36 AM2020-03-18T06:36:32+5:302020-03-18T06:36:51+5:30

आयआयटी बॉम्बेकडून याआधी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सूचनांनुसार आयआयटी बॉम्बेमधील सेंट्रल लायब्ररीसारख्या सुविधा आणि प्रयोगशाळा याआधीच बंद करण्यात आल्या आहेत.

Instructions to IIT Mumbai students to leave hostel | आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्याचे निर्देश

आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्याचे निर्देश

Next

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत आयआयटी बॉम्बेमधील सर्व विद्यार्थ्यांना येत्या ७२ तासांत म्हणजेच २० मार्चपर्यंत वसतिगृहे खाली करण्याचे निर्देश संचालक सुभाषिश चौधरी यांच्याकडून देण्यात आले आहेत.
आयआयटी बॉम्बेकडून याआधी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सूचनांनुसार आयआयटी बॉम्बेमधील सेंट्रल लायब्ररीसारख्या सुविधा आणि प्रयोगशाळा याआधीच बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मंगळवारी आयआयटी बॉम्बेमधील सर्व विभागप्रमुख आणि प्रशासकीय प्रमुखांची तातडीची बैठक घेऊन येत्या ७२ तासांत आयआयटीमधील येण्या-जाण्यावर कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय कारणामुळे आपल्या मूळ गावी परतणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांनी संबंधित डीनची परवानगी तेथील वास्तव्यासाठी घेणे आवश्यक आहे. येत्या काही दिवसांत आयआयटीमधील खानावळ बंद करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी विशेष परवानगी घेतल्यास मर्यादित व्यवस्था करता येणे शक्य असल्याचे चौधरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 

 

Web Title: Instructions to IIT Mumbai students to leave hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.