Join us  

आयएनएस मार्मागोवा जलावतरणासाठी सज्ज

By admin | Published: September 15, 2016 3:42 AM

माझगाव गोदीत बांधणी करण्यात आलेल्या आयएनएस मार्मागोवा (मुरगाव) युद्धनौका जलावतरणासाठी सज्ज झाली असून शनिवारी नौदल प्रमुख सुनिल लान्बा यांच्या

मुंबई : माझगाव गोदीत बांधणी करण्यात आलेल्या आयएनएस मार्मागोवा (मुरगाव) युद्धनौका जलावतरणासाठी सज्ज झाली असून शनिवारी नौदल प्रमुख सुनिल लान्बा यांच्या उपस्थितीत आयोजित केल्या जाणाऱ्या सोहळ्यात ही युद्धनौका प्रथमच समुद्रात प्रवेश करणार आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स (एमडीएल)ने या युद्धनौकेची नियोजित वेळेआधीच बांधणी केली आहे. विशाखापट्टण्णम् श्रृंखलेतील ही दुसरी युद्धनौका असून गोव्यातील मार्मागोवा बंदराचे नाव या नौकेला देण्यात आले आहे. शनिवारी नौदलप्रमुखांच्या उपस्थितीत या युद्धनौकेचे जलावतरण होईल. २०२० पर्यंत ही युद्धनौका नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)गेल्या काही वर्षांपासून संरक्षण दलांसाठी लागणारे साहित्य, शस्त्रास्त्रे भारतातच तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून संरक्षण साहित्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी एमडीएल, डीआरडीओ आदी संस्था कामाला लागल्या आहेत. एमडीएलने गेल्या सहा वर्षात नौदलासाठी वर्षाकाठी एक युद्धनौकेची बांधणी केली आहे. २०१० साली आयएनएस शिवालिकच्या निर्मितीनंतर याच आयएनएस सातपुरा, आयएनएस सह्याद्री नौदलासाठी बांधण्यात आली. तर, आयएनएस कोलकात्ता आणि आयएनएस कोची या विनाशिका बांधण्यात आल्या. तर, आॅगस्ट २०१६ मध्ये आयएनएस चेन्नई नौदलाला सोपविली.