Join us  

पावसामुळे भाजीपाल्याला बसतेय महागाईची फोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 1:56 AM

अवकाळीचा परिणाम : काही भाज्या महागल्या तर काही भाज्या स्वस्त

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे. त्याचा जसा वाहतुकीवर परिणाम झाला, तसा भाजीपाल्यावरदेखील झाल्याने भाज्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मुंबईतील भाज्यांची आवक घटली आहे. परिणामी भाज्या महागल्या आहेत.

मुंबईला राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येतो. यामध्ये नाशिक सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर येथून जास्त प्रमाणात भाजीपाला येतो. परंतु गेले काही दिवस या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. येथून येणाऱ्या भाज्यांच्या गाड्या येऊ शकल्या नाहीत. तसेच काही ठिकाणी भाज्यांचे नुकसान झाले. याचा परिणाम भाजीपाला पुरवठ्यावर झाला आहे. या भागातून येणाºया भाजीपाल्याची आवक घटली असून सर्वच पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. यामध्ये भेंडी, हिरवी मिरची, शिमला मिरची, तोंडली यांचे दर दुप्पट झाले आहेत. असे असले तरी काही भाज्यांचे दर कमी झाले आहेत. तर मेथी, कोथिंबीर, वांगी, टोमॅटो यांच्या दरात घसरण झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेल्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. सकाळी कोथिंबीर जुडी १५० रुपयांनी विकली. परंतु पावसामुळे ग्राहक घटले, भाज्या भिजल्या. दुपारी याच जुड्या ५० रुपये दराने विकाव्या लागल्या.- नारायण पाटील, भाजी विक्रेतादिवसेंदिवस भाज्यांच्या दरांमध्ये जास्तच वाढ होत आहे. असे असताना पाऊस पडल्यानंतर त्यात आणखीनच भर पडते. भाज्या जास्त महाग झाल्या आहेत. भाज्या महागल्याने दैनंदिन नियोजन बिघडले आहे.- अनिता साठे, गृहिणीभाजी पूर्वीचे दर सध्याचे दर(प्रतिकिलो)भेंडी ४० रुपये ६० रुपयेहिरवी मिरची ४० रुपये ८० रुपयेमेथी ४० रुपये (जुडी) ३० रुपयेशिमला मिरची ४० ते ४५ रुपये ६० रुपयेवांगी ५० ते ५५ रुपये ४० रुपयेतोंडली २० रुपये ४० रुपयेटोमॅटो ५० रुपये ३० रुपयेकोथिंबीर १५० रुपये(जुडी) ५० रुपयेगवार ६० रुपये ४० रुपयेवाल २० रुपये ४० रुपये 

टॅग्स :मुंबईबाजारमहागाई