चित्रपट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा, चित्रपटसृष्टी यूपीत जाऊ नये म्हणून धोरण - अमित देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 07:09 AM2020-12-12T07:09:29+5:302020-12-12T07:10:37+5:30

Cinema : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  उत्तर प्रदेशात चित्रपटनगरी उभारण्याची घोषणा करताच महाविकास आघाडी सरकारने एक पाऊल पुढे टाकत चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला

Industry status to the film sector, policy so that filmmaking does not go to UP - Amit Deshmukh | चित्रपट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा, चित्रपटसृष्टी यूपीत जाऊ नये म्हणून धोरण - अमित देशमुख

चित्रपट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा, चित्रपटसृष्टी यूपीत जाऊ नये म्हणून धोरण - अमित देशमुख

Next

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  उत्तर प्रदेशात चित्रपटनगरी उभारण्याची घोषणा करताच महाविकास आघाडी सरकारने एक पाऊल पुढे टाकत चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. तशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केली. यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राचे जाळे विस्तारत असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळण्यास मदत होते. त्यामुळे चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देण्यासंदर्भातला प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात चित्रपट नगरी उभारण्याचे काम सुरू असताना महाराष्ट्रात या क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याची तयारी सुरू झाली आहे.

असा दर्जा मिळाल्याने काय होईल फायदा?
मनोरंजन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा मिळाल्यास लघू आणि मध्यम उद्योगांना मिळणाऱ्या सवलती या क्षेत्रासदेखील मिळतील. चित्रपट/ करमणूक उद्योगाची व्याप्ती मोठी आहे. 
 मनोरंजन वाहिन्या, डिजिटल मीडिया, लाइव्ह इव्हेंट, ॲनिमेशन, आऊट ऑफ होम मीडिया, सिनेमा, रेडिओ यांच्यासह अनेक बाबींचा यात मध्ये मावेश होतो. चित्रपट (शॉर्ट फिल्मस/ ओटीटीवर प्रदर्शित होणारे सिनेमे) आणि मनोरंजन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारले असून या क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देणे गरजेचे आहे. 
n या संदर्भात चित्रपट, मालिका, ओटीटीसह रंगमंच, लोककला, माहितीपट, जाहिरातपट यासाठीही धोरण तयार करण्यात येत देशमुख यांनी दिली.

Web Title: Industry status to the film sector, policy so that filmmaking does not go to UP - Amit Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.