Join us  

भारतीयांना ओढ विदेशी पर्यटनाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 7:30 AM

‘जागतिक पर्यटन संस्थे’तर्फे १९८० पासून २७ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक पर्यटन दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. गेल्या काही वर्षांत थंड हवेची ठिकाणे, समुद्रकिनारे यांसह क्रुझ, विदेशी पर्यटनालाही पसंती मिळत आहे.

- महेश चेमटेमुंबई : ‘जागतिक पर्यटन संस्थे’तर्फे १९८० पासून २७ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक पर्यटन दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. गेल्या काही वर्षांत थंड हवेची ठिकाणे, समुद्रकिनारे यांसह क्रुझ, विदेशी पर्यटनालाही पसंती मिळत आहे.यंदा ‘डिजिटायझेशन इन टुरिझम’ या संकल्पनेवर पर्यटन दिन साजरा करण्यात येत आहे. पर्यटनाला ‘डिजिटल मार्केटिंग’ तंत्राची जोड लाभल्याने पर्यटन सोपे तसेच रोजगाराभिमुखदेखील झाले आहे. महाविद्यालयीन शिक्षणात टॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम या अभ्यासक्रमाचा समावेश केल्यानंतर रोजगारासाठीचे पर्यटन क्षेत्राचे नवे दालन खऱ्या अर्थाने खुले झाले आहे. पर्यटनात मेडिकल पर्यटन, इको पर्यटन, क्रुझ पर्यटन अशा अनेक नव्या पर्यायांची भर पडत आहे. जागतिक पर्यटनासाठी आवश्यक व्हिसा, पासपोर्ट किंवा विदेशी चलन हस्तांतरणासारख्या सेवांमुळे रोजगार मिळवून देणारे हे क्षेत्र व्यापक होत आहे. आजच्या घडीला दरवर्षी २५ लाख भारतीय परदेश दौरे करतात. २०२० पर्यंत हा आकडा ५० लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज पर्यटन विशेषज्ञ शुभंकर करंडे यांनी वर्तवला.सद्य:स्थितीत क्रुझ पर्यटनाकडेही भारतीयांचा अधिक कल आहे. क्रुझ पर्यटनाद्वारे रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत असल्याचे रुईया महाविद्यालयातील टुरिझम अ‍ॅण्ड ट्रॅव्हल व्यवस्थापन विभागाच्या (बी.व्होक) प्रमुख आणि प्राध्यापिका अमृता गोखले यांनी सांगितले. तर, आॅक्टोबरमध्ये मुंबई-गोवा क्रुझ सुरू होणार असून यामुळे क्रुझसाठी विदेशी जाणाºया पर्यटकांना मुंबईतच क्रुझची सेवा उपलब्ध होईल, असे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले. दुसरीकडे विमानांच्या तिकिटांत सवलत, सोबत कमी दरात हॉटेल बुकिंग अशा विविध पॅकेजेसमुळे परदेशी पर्यटन परवडणारे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.संख्या दुपटीने वाढलीगेल्या दहा वर्षांत भारतातून विदेशात सहलीसाठी जाणाºया पर्यटकांची संख्या दुपटीहून अधिक वाढली आहे. २००६ मध्ये ८.३४ लाख पर्यटक भारतातून परदेशात पर्यटनासाठी गेले होते. तर २०१६ मध्ये हीच संख्या २१.८७ लाख एवढी वाढल्याचे दिसून आले.

टॅग्स :पर्यटनमुंबई