Join us  

भारतात ‘आयआयटी बॉम्बे’ अव्वल, १०० पैकी आयआयटी बॉम्बेने पटकावले ८३.६ गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 6:20 AM

मुंबई: ‘क्वॅककॉलिर्स सायमंड्स’च्या (क्यूएस) ब्रिक्स (ब्राझील, रशिया, इंडिया, चीन, साउथ आफ्रिका) क्रमवारीत आयआयटी बॉम्बे भारतात अव्वल ठरले आहे

मुंबई: ‘क्वॅककॉलिर्स सायमंड्स’च्या (क्यूएस) ब्रिक्स (ब्राझील, रशिया, इंडिया, चीन, साउथ आफ्रिका) क्रमवारीत आयआयटी बॉम्बे भारतात अव्वल ठरले आहे, तर ब्रीक्समध्ये आयआयटी बॉम्बेने नववा क्रमांक पटकावला आहे. आयआयटी बॉम्बे ‘क्यूएस’च्या क्रमवारीत आशियात ३४व्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे.जून महिन्यांत क्यूएसच्या जागतिक क्रमवारीत आयआयटी बॉम्बे १७९ क्रमांकावर होते. आयआयटी बॉम्बेची कामगिरी यंदा क्रमवारीत सातत्याने पुढे जाताना दिसत आहे. ब्रीक्स २०१८ ची क्रमवारी क्यूएसने बुधवारी जाहीर केली, त्या वेळी आयआयटी बॉम्बे देशात अव्वल असल्याचे जाहीर केले. ‘रिजन युनिव्हर्सिटी’ क्रमवारीत ब्रीक्समध्ये आयआयटी बॉम्बे ३ टक्क्यांमध्ये आहे. रिजन युनिव्हर्सिटीमध्ये तब्बल ९ हजार विद्यापीठे, संस्थांचा सहभाग होता. आयआयटी बॉम्बेचे काम वाखाणण्याजोगे असल्याचे निदर्शनास आले आहे.२०१६-१७ च्या क्रमवारीच्या तुलनेत आयआयटी बॉम्बे चारने पुढे जाऊन अव्वल होण्याचा मान पटकावला आहे. १०० पैकी आयआयटी बॉम्बेने ८३.६ गुण मिळविले आहेत.शैक्षणिक क्षेत्रात ९८.१, एम्पलॉयरमध्ये ९९.७, शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तरात ४७.८, पीएच.डीधारक कर्मचाºयांसाठी ९६.९, आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षकांसाठी १५.४, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी ७.६ गुण आयआयटी बॉम्बेला प्राप्त झाले आहेत. हे सर्व गुण १०० पैकी देण्यात आले आहेत. ब्रीक्सच्या क्रमवारीत आयआयटी बॉम्बेने एम्लॉयर रेप्युटेशनमध्ये आठवा क्रमांक पटकावला आहे.>संशोधन, शिक्षणाला महत्त्वब्रीक्सच्या क्रमवारीतही आयआयटी बॉम्बेने उत्तम कामगिरी केली आहे. संशोधन आणि शिक्षण या दोन गोष्टींना महत्त्व दिल्यामुळे हे यश मिळत आहे. या यशात सर्वांचा सहभाग आहे. आयआयटी बॉम्बे ही दिवसेंदिवस प्रगती करत असल्याने, नक्कीच आनंदाची बाब असल्याचे मत आयआयटीचे संचालक प्रा. देवांग खख्खर यांनी मांडले.