Join us  

India China Faceoff: केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 4:35 AM

तसेच २० शहीद जवानांना आदरांजली वाहिली. ‘शहिदों को सलाम’ दिवस पाळण्यात आला.

मुंबई : चीन सातत्याने कुरापती काढत असताना केंद्रातील मोदी सरकार मात्र प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरले असून त्यांनी चीनसमोर सपशेल शरणागती पत्करली आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. केंद्र सरकारच्या या नाकर्तेपणाचा जाब विचारण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. तसेच २० शहीद जवानांना आदरांजली वाहिली. ‘शहिदों को सलाम’ दिवस पाळण्यात आला. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, आमदार भाई जगताप, आ. अमिन पटेल, आ. झिशान सिद्दीकी, चरणजितसिंग सप्रा, मधु चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत हे उपस्थित होते.दुपारी गांधी भवन येथे थोरात व चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, केंद्र सरकार देशाच्या संरक्षणासाठी जो निर्णय घेईल त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे; परंतु चीनने भारताच्या भूमीवर घुसखोरी केलीच नाही हे पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य चीनला पोषक ठरले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला; परंतु ते पुरेसे नसून सरकारने पंतप्रधानांच्या ‘त्या’ विधानावर खुलासा करावा, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.>इंधन दरवाढीमुळे कंबरडे मोडलेइंधनदरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून माल वाहतूक महागल्यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. तेल कंपन्या रोज दरवाढ करत आहेत. देशावर कोरोनाचे संकट असताना इंधनदरवाढीने त्यात भर पडल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.