Join us

फलाटांची उंची तातडीने वाढवावी

By admin | Updated: August 11, 2015 01:55 IST

फलाटांची उंची वाढवण्याची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए.के. मित्तल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. लोकल आणि फलाटात असणाऱ्या गॅपमुळे

मुंबई : फलाटांची उंची वाढवण्याची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए.के. मित्तल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. लोकल आणि फलाटात असणाऱ्या गॅपमुळे प्रवाशांना अपघातांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून फलाटांची उंची वाढवण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत, मात्र ती अपेक्षित वेगाने करण्यात येत नसल्यामुळे मित्तल यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. लोकल आणि प्लॅटफॉर्मधील असलेल्या मोठ्या गॅपमुळे काही प्रवाशांना प्राण गमवावा लागतो; तर काही गंभीर जखमी होतात. याबाबत उच्च न्यायालयाकडून विचारणा झाल्यानंतर रेल्वेकडून प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले. पश्चिम रेल्वेमार्गावर २८ स्थानकांमध्ये १४0 प्लॅटफॉर्म असून, यातील ५0 प्लॅटफॉर्मची उंची ही ८४0 मीटर ते ९00 मीटर एवढी आहे. या प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वेवरील ७६ स्थानकांवर २७३ प्लॅटफॉर्म आहेत. यात ४0 प्लॅटफॉर्मची उंची फारच कमी असून, ती वाढवण्यात येत आहे. ही कामे धीम्या गतीने सुरू असल्याने त्याची माहिती मुंबईत आलेले रेल्वे बोर्ड अध्यक्ष ए.के. मित्तल यांनी घेतली. प्लॅटफॉर्मची उंची वाढवा, स्वच्छतेवर भर द्या, जास्तीतजास्त सरकते जिने बसवा अशा सूचनाही त्यांनी केल्या.