Join us  

गेटवेपासून सागरी प्रवास महागला, एलिफंटा, अलिबाग तिकीटदरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 5:08 AM

गेटवे आॅफ इंडिया ते एलिफंटा दरम्यान लक्झरीच्या सागरी प्रवासी तिकिटात मंगळवारपासून २० रुपयांची वाढ झाली आहे, तर गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा-अलिबाग या सागरी तिकीटदरातही १० रुपयांनी वाढ केल्याचे, गेटवे -एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेचे सेक्रेटरी किफायत मुल्ला यांनी सांगितले.

उरण - गेटवे आॅफ इंडिया ते एलिफंटा दरम्यान लक्झरीच्या सागरी प्रवासी तिकिटात मंगळवारपासून २० रुपयांची वाढ झाली आहे, तर गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा-अलिबाग या सागरी तिकीटदरातही १० रुपयांनी वाढ केल्याचे, गेटवे -एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेचे सेक्रेटरी किफायत मुल्ला यांनी सांगितले.गेटवे आॅफ इंडिया ते एलिफं टा आणि गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा-अलिबाग या सागरी मार्गावर गेटवे एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेच्या लाँचेस मागील अनेक वर्षांपासून पर्यटक आणि प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. गेटवे-एलिफंटा या सागरी मार्गावर दरवर्षी सुमारे १२ लाख पर्यटक प्रवास करतात. पर्यटकांकडून या आधी परतीच्या प्रवासासह १८० रुपये मोजावे लागत होते. मात्र, नवीन वर्षापासून २०० रुपये मोजावे लागणार आहेत. आॅर्डनरी लाँचेसच्या १४५ रुपये हा कायम ठेवण्यात आला आहे. देशी-विदेशी पर्यटकांना समुद्रसफरीचा आनंद घेण्यासाठी संस्थेमार्फत अर्ध्या तासाची समुद्र हार्बर सफरही घडविली जाते. यासाठी आधी ८० रुपये तिकीटदर होता. २ जानेवारीपासून ९० रुपये मोजावे लागणार आहेत.गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा-अलिबाग या सागरी तिकीटदरातही १० रुपयांनी वाढ झाली. या आधी या मार्गावरील सागरी प्रवासासाठी ९५ रुपये तिकीटदर होता. त्यासाठी १०५ रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये मांडवा-अलिबाग बस सर्व्हिसचाही समावेश असल्याची माहिती संस्थेचे सदस्य सौरभ करमरकर यांनी दिली. या तिकीटदरवाढीसाठी शासनाने परवानगी दिली आहे. इतर कर वगळून १० रुपयांनीच दरवाढ करण्यात आल्याचा दावा गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेचे सेक्रेटरी किफायत मुल्ला आणि सदस्य कौस्तुभ करमरकर यांनी केला आहे.

 

टॅग्स :प्रवासमुंबई