Join us  

पावसाळ्याशी संबंधित वस्तूंचा अत्यावश्यक श्रेणीत समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पावसाळा लवकरच सुरू होणार आहे; त्यामुळे पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची मागणी वाढणार आहे. त्यामुळे या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पावसाळा लवकरच सुरू होणार आहे; त्यामुळे पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची मागणी वाढणार आहे. त्यामुळे या वस्तूंचा अत्यावश्यक श्रेणीत समावेश करा, अशी मागणी दुकानदार संघटनेने केली आहे.

फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह म्हणाले की, पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची मागणी वाढणार आहे. सिमेंट, रेडिप्लास्टर, मोटार दुरुस्ती, मायक्रोकोंक्रेट,रंग, वॉटरप्रुफिंग वस्तू, रेनकोट, छत्री, ताडपत्री, प्लम्बिंग वस्तू यांच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे या वस्तू अत्यावश्यक श्रेणीत घ्याव्यात.

किरकोळ आणि होलसेल दुकाने आणि पुरवठादार यांना अत्यावश्यक श्रेणीत आणावे. राज्यातील नागरिकांची गैरसोय होणार नाही. तुम्ही तत्काळ मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा कराल अशी अपेक्षा आहे.

तसेच मुंबई आणि राज्यातील इतर शहरांमध्ये कोरोना रुग्ण कमी होत आहेत. त्यांनी अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तूंची दुकाने सुरू करण्याबाबत विचार करावा, असेही ते म्हणाले.