Join us

मुंबईतही वेणी कापल्याची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 02:05 IST

गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या वेण्या कापण्याच्या घटना मुंबई बाहेर घडत आहेत.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या वेण्या कापण्याच्या घटना मुंबई बाहेर घडत आहेत. पण, शनिवारी मध्यरात्री मुंबईतील आग्रीपाडा येथेही वेणी कापण्याची घटना घडल्याची नोंद झाली आहे.आग्रीपाडा परिसरात राहणाºया फरीदा नावाच्या महिलेने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तिची वेणी कापल्याची तक्रार दाखल केली आहे. फरीदा या जुल्हा मैदानाजवळील अरब मशिदीच्या समोर राहतात. फरीदा यांच्या म्हणण्यानुसार, फरीदा आणि त्यांची मुलगी घरात झोपल्या होत्या. दाराला आतून कडी लावलेली होती. शनिवारी रात्री दोन वाजता फरीदा यांना मधेच जाग आली. तेव्हा त्यांची वेणी कापल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. आग्रीपाडा पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.या प्रकरणी परिसरातील काही जणांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकारामुळे परिसरात महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.