Join us  

नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण आले ११ टक्यांवर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 2:49 PM

ठाण्यात कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या विविध प्रयत्नांमुळे कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण हे २० टक्यांवरुन ११ टक्यांवर आले आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्यांवर आले असून चाचण्यांची संख्या १९३ वरुन दिवसाला आता ५५०० च्या आसपास चाचण्या केल्या जात आहेत.

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाला अटकाव करण्यासाठी महापालिका पातळीवर विविध स्वरुपाचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता कोरोना चाचणी प्रमाण हे वाढले असून ते आता ५५०० च्या घरात आले आहे. तर दुसरीकडे त्यामध्ये नवीन रु ग्ण आढळण्याचे प्रमाण नऊ टक्यांनी घटल्याची माहिती पालिकेने दिली. यापुर्वी नवीन रु ग्ण आढळण्याचे प्रमाण २० टक्यांवर होते. तेच आता ११ टक्यांवर आले आहे. तर रु ग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्यावरुन पुन्हा ८८ टक्यांवर आले आहे.                    मार्च महिन्यापासून ठाण्यात कोरोना बाधीत रुग्ण आढळण्यास सुरवात झाली. त्यानंतर जून, जुलै आणि आॅगस्ट शिवाय सप्टेंबर महिन्यातही कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढतांना दिसली आहे. सप्टेंबर महिन्यात १० हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळले असले तरी ८ हजाराहून अधिक रुग्ण बरे देखील झाले असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान कोरोनाचा अटकाव करण्यासाठी पालिकेने आता चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. करोना रु ग्णांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ उपचार देता यावेत आणि शहरातील करोनाची साखळी तोडता यावी, या उद्देशातून चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्या अखेरपर्यंत रोज सरासरी २३०० चाचण्या केल्या जात होत्या आणि त्यामध्ये दोनशेच्या आसपास रु ग्ण आढळून येत होते. सप्टेंबर महिन्यापासून चाचण्यांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. त्यामुळे आता दिवसाला ५५०० हून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. त्यात ४०० च्या आसपास रु ग्ण आढळून येते होते. गेल्या काही दिवसांपासून रु ग्ण संख्या कमी होऊन ३०० आसपास आली आहे. असे असतानाच गेल्या महिनाभरात रु ग्ण आढळण्याचे प्रमाण २० टक्यांवरुन ११ टक्यांवर आले आहे. तर, सप्टेंबर महिना अखेरपर्यंत रु ग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्यांवरुन ८७ टक्यांवर आले होते. आॅक्टोंबर महिन्यात आता ते ८८ टक्यांवर आले आहे. त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत रु ग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाल्याचे आणि त्याचबरोबर रु ग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. आॅक्टोबर महिन्यात रुग्ण दरवाढीचे प्रमाण कमी झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वाढल्याचे दिसत आहे.दरम्यान मागील सहा महिन्याचा विचार केल्यास एप्रिल महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९.७३ टक्के होते. ते सप्टेंबर अखेर पर्यंत ८७ टक्यांवर आले आहे. तर रु ग्ण आढळण्याचे प्रमाण एप्रिल महिन्यात ६.४० टक्के होते. तर आॅगस्ट महिन्यात हे प्रमाण १५.६३ टक्के होते. ते आता ११ टक्यांवर आले आहे. तर याच कालावधीत म्हणजेच एप्रिल महिन्यात दररोज कोरोना चाचण्यांची संख्या ही १९३ होती. तर सप्टेंबर अखेर ही संख्या ५३१८ वर आली आहे. 

टॅग्स :ठाणेठाणे महापालिकाकोरोना वायरस बातम्या