Join us  

‘शुश्रूषा’च्या तुलसियानी रुग्णालयाचे उद््घाटन सोमवारी, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 3:57 AM

शुश्रूषा सिटीझन्स को-आॅपरेटिव्ह हॉस्पिटल या संस्थेच्या वतीने विक्रोळी पूर्व येथे उभारण्यात आलेल्या सुमन रमेश तुलसियानी

मुंबई : शुश्रूषा सिटीझन्स को-आॅपरेटिव्ह हॉस्पिटल या संस्थेच्या वतीने विक्रोळी पूर्व येथे उभारण्यात आलेल्या सुमन रमेश तुलसियानी रुग्णालयाचे उद््घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी, १४ मे रोजी सायंकाळी सव्वासहा वाजता होणार आहे.हा कार्यक्रम विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर-२ मध्ये विकास कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक हे असतील.तसेच विशेष अतिथी म्हणून राज्याचे तंत्र व उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्रीप्रकाश मेहता, सार्वजनिक आरोग्यव कुटुंबकल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत, सहकारमंत्री सुभाषदेशमुख व मुंबईचे महापौरविश्वनाथ महाडेश्वर उपस्थित राहाणार आहेत.देशात व राज्यात सामान्य नागरिकांना योग्यवेळी व योग्य दरात वैद्यकीय सेवा मिळणे आवश्यक आहे पण तसे होताना दिसत नाही. मुंबईच्या पूर्व उपनगरांत मध्यम व निम्नमध्यम वर्गातील नागरिक राहातात. त्यांना माफक दरात उत्तम वैद्यकीय सेवा द्यावी या उद्देशाने नागरिकांच्या सहकारातून ‘शुश्रूषाह्णने सुमन रमेश तुलसियानी रुग्णालय उभारले आहे असे यासंदर्भातील एका पत्रकात शुश्रूषा सिटीझन्स को-आॅपरेटिव्ह हॉस्पिटल या संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. एन. एस. लाड यांनी म्हटले आहे.