दुकानं, बाजारपेठ, हॉटेलच्या वेळेत सुधारणा; व्यापारी संघटनांच्या मागणीनुसार पालिकेचे सुधारित परिपत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 09:59 PM2020-10-15T21:59:03+5:302020-10-15T21:59:19+5:30

'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत जून महिन्यात मुंबईतील दुकानं, बाजारपेठ, आस्थापना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली.

Improvements in shops, markets, hotel times; Revised circular of the municipality as per the demand of trade associations | दुकानं, बाजारपेठ, हॉटेलच्या वेळेत सुधारणा; व्यापारी संघटनांच्या मागणीनुसार पालिकेचे सुधारित परिपत्रक

दुकानं, बाजारपेठ, हॉटेलच्या वेळेत सुधारणा; व्यापारी संघटनांच्या मागणीनुसार पालिकेचे सुधारित परिपत्रक

Next

मुंबई - व्यापारी संघटनांच्या मागणीनुसार मुंबईतील दुकानं, बाजारपेठ, आस्थापनांची वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यानुसार आता स. ७ ते रात्री ९.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. तर हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट व बार देखील स. ९ ते ११.३० या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भातील सुधारित परिपत्रक महापालिका प्रशासनाने गुरुवारी जाहीर केले आहे.

'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत जून महिन्यात मुंबईतील दुकानं, बाजारपेठ, आस्थापना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. मात्र त्यांची वेळ स. ९ ते सं. ७ अशी होती. तसेच ५ ऑक्टोबरपासून मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट व बार ३३ टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची मंजुरी मिळाली आहे. मात्र या वेळेत वाढ करून मिळण्याची मागणी व्यापारी संघटनांकडून केली जात होती. ही मागणी पालिका प्रशासनाने अखेर मान्य केली आहे.

दुकानं व बाजारपेठ सुरू ठेवण्याची वेळ आता सकाळी ७ ते रात्री ९.३०, तर हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट व बार यांची वेळ स. ९ ते रात्री ११.३० असणार आहे. मात्र सोशल डिस्टन्सचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. तसेच मास्कचा वापर व गर्दी टाळण्यासाठी अन्य उपाययोजनाही कराव्या लागणार आहेत. मात्र प्रतिबंधित क्षेत्रात पूर्वीप्रमाणेच निर्बंध लागू राहणार आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कलम १८८ अंतर्गत कारवाईचा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे.

 

Web Title: Improvements in shops, markets, hotel times; Revised circular of the municipality as per the demand of trade associations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.